जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / सिद्धार्थ मल्होत्राबरोबर लग्न झाल्यानंतर इतकं बदललं कियाराचं आयुष्य; म्हणाली, आता घर चालवावं...

सिद्धार्थ मल्होत्राबरोबर लग्न झाल्यानंतर इतकं बदललं कियाराचं आयुष्य; म्हणाली, आता घर चालवावं...

Kiara Advani Sidharth Malhotra

Kiara Advani Sidharth Malhotra

न्यूज 18डॉट कॉमशी बोलताना लग्नानंतर कियाराचं आयुष्य किती बदललं आहे याविषयी तिनं खुलेपणानं भाष्य केलंय. लग्नानंतर कियारा खूप आनंदी दिसली पण…

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 06 मार्च :  बॉलिवूडचं प्रसिद्ध कपल असलेल्या सिद्धार्थ आणि कियारा अडवाणीनं फेब्रुवारी महिन्यात लग्न. राजस्थानच्या जैसलमेरमध्ये दोघांनी शाही विवाह केला.  7 फेब्रुवारी 2023ला दोघांनी लग्नगाठ बांधली आणि आता महिन्याभरात दोघांच्या नव्या संसाराला सुरूवात देखील झाली आहे. लग्नानंतर दोघांच्या आयुष्यात खूप बदल झाले आहेत. कियारा तर तिचं घर सोडून सिद्धार्थच्या घरी आली आहे. तर सिद्धार्थवरची जबाबदारी देखील वाढली आहे. न्यूज 18डॉट कॉमशी बोलताना  लग्नानंतर कियाराचं आयुष्य किती बदललं आहे याविषयी तिनं खुलेपणानं भाष्य केलंय. त्याचप्रमाणे दोघांच्या वैयक्तिक आयुष्याविषयी देखील तिला अनेक प्रश्न विचारण्यात आले ज्याची तिनं मनसोक्त उत्तर देखील दिली. सिद्धार्थमधील 3 चांगले गुण कोणते असा प्रश्न कियाराला विचारण्यात आला. तेव्हा ती हसत हसत म्हणाली फक्त तीनच. त्यानंतर किरायानं सिद्धार्थची चांगलीच प्रशंसा केली. त्याच्या चांगल्या गुणांबद्दल सांगताना कियारा म्हणाली, “तो त्याच्या आजूबाजूला असलेल्या लोकांचा खूप सन्मान करतोय. यात सिनीअर्स, ज्युनिअर्स त्यांच्या आजूबाजूच्या सगळ्यांचा यात समावेश आहे. त्याच्या या गुणाचा मी खूप सन्मान करते”. हेही वाचा - रात्री 2वाजता स्क्रिप्ट ऐकवली, सकाळी 7 वाजता शुटींग सुरू; सिनेमा झाला ब्लॉकबस्टर कियारा पुढे म्हणाली, “तो नेहमीच उत्साही असतो. लोकांबद्दल त्यांच्या मनात खूप प्रेम आहे. त्याचप्रमाणे मला असं वाटतं की तो एक उत्तम जोडीदार आहे. तो मला नेहमीच मोटिवेट करत असतो. मग ते कामात असो किंवा कोणत्याही नवी गोष्टी करण्यात असो. तो खूप धाडसी आणि खूप मोटिवेशनल माणूस आहे”.

जाहिरात

लग्नानंतर आयुष्यात किती बदल झालेत असं विचारल्यानंतर कियारा म्हणाली,  “मी आयुष्यात पहिल्यांदा संपूर्ण घर चालवतेय. मी आधी माझ्या आई-वडीलांच्या घरी राहत होते. तिथे माझी आई सगळं काही पाहत होती. माझ्या मनात आजही त्यांच्यासाठी खूप सन्मानं आणि महत्त्व आहे. आता लग्नानंतर माझं आयुष्य खूप सुंदर झालंय. हा माझ्या आयुष्याचा सुंदर टप्पा आहे. तुम्ही बघू शकता, मी खूप आनंदी आहे.”

News18लोकमत
News18लोकमत

सिद्धार्थ आणि कियाराच्या लग्नाला आता एक महिना झाला आहे. दोघांच्या लग्नाच्या चर्चा आजही होत आहेत. त्याच्या लग्नातील प्रत्येक गोष्ट खास होती. राजस्थानमध्ये फार मोजकी मंडळी त्यांच्या लग्नाला उपस्थित होती. त्यानंतर मुंबईत त्यांनी ग्रँड रिसेप्शन पार्टी दिली  होती. दोघांनी आपल्या लग्नात कपड्यांपासून, लग्नाच्या ठिकाणापर्यंत सगळ्याच गोष्टींवर प्रचंड पैसे खर्च केले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात