बायको- मुलांसोबत सहा वर्षांनी आमिर खान घरी परतणार

आमिर त्याच्या कार्टर रोड येथील भाड्याच्या घरात राहतोय. मीडिया रिपोर्टनुसार, आमिरने कार्टर रोडवरील बिल्डिंगमधील दोन मजले भाड्याने घेतले होते.

News18 Lokmat | Updated On: May 31, 2019 02:56 PM IST

बायको- मुलांसोबत सहा वर्षांनी आमिर खान घरी परतणार

मुंबई, 31 मे- सुपरस्टार आमिर खान सध्या अनेक कारणांमुळे चर्चेत आहे. एकीकडे त्याचं पाणी फाउंडेशनचं काम सुरू आहे तर दुसरीकडे तो आपल्या जुन्या घरी परतत आहे. सध्या आमिर त्याच्या कार्टर रोड येथील भाड्याच्या घरात राहतोय. मीडिया रिपोर्टनुसार, आमिरने कार्टर रोडवरील बिल्डिंगमधील दोन मजले भाड्याने घेतले होते. 'मिड डे'ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, आमिर सहा वर्षांनी त्याच्या जुन्या घरी राहायला जाणार आहे. पाली हिल येथील मरीना अपार्टमेन्टमध्ये आमिरचं घर आहे. हे घर आमिरच्या फार जिव्हाळ्याचं आहे. यामुळेच आपल्या जुन्या घरी जाण्याचा आमिरने निर्णय घेतला.

‘या’ आजाराने त्रस्त होत्या तनुजा, करावी लागली सर्जरी

याशिवाय कार्टर रोड येथील भाड्याच्या घराचा करार लवकरच संपणार आहे. आमिरने नव्याने करार न करण्याचा निर्णय याआधीच घेतला होता. गेल्या अनेक दिवसांपासून तो जुन्या घरी परत जाण्याची तयारी करत होता. यामुळेच त्याने जुन्या घराची डागडुजीही करून घेतली. घराच्या दुरुस्तीची संपूर्ण जबाबदारी आमिरने किरण रावकडे दिली होती. सध्या ती घराच्या बारीक गोष्टींकडे लक्ष देत आहे.

मोदींच्या शपथविधी सोहळ्यात गर्दीत अडकल्या आशा भोसले, स्मृती इराणींनी अशी केली मदत


Loading... 

View this post on Instagram
 

Happy Maharashtra Day! #mejalmitra #paanifoundation @paanifoundation


A post shared by Aamir Khan (@_aamirkhan) on

कपिल शर्मापासून कंगना रणौतपर्यंत या कलाकारांनी लावली मोदींच्या शपथ ग्रहणाला हजेरी

घराच्या डागडुजीसोबतच आमिर आणि किरण दोघंही पाणी फाऊंडेशनसाठी महाराष्ट्रभर फिरत आहेत. अगदी छोट्यात छोट्या गावांना भेट देऊन ते तिथल्या पाण्याच्या समस्या समजावून घेत आहेत. दोघं स्वतः अनेक ठिकाणी गावकऱ्यांसोबत श्रमदान करताना दिसतात. काही दिवसांपूर्वी साताऱ्या जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यात श्रमदान करतानाचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. स्वतः आमिर त्याच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून पाणी फाउंडेशनसंबंधित अनेक पोस्ट शेअर करत असतो.

VIDEO- आजोबांच्या आठवणीत ढसाढसा रडली न्यासा देवगण, बाबांनी असे सावरले

VIDEO : ईश्वराची शपथ न घेता रामदास आठवलेंनी अशी घेतली शपथ

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: aamir khan
First Published: May 31, 2019 12:55 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...