सलमान आणि ओम पुरी यांना बजरंगी भाईजान आणि ट्यूबलाइट या दोन सिनेमांत एकत्र काम केलं. २०१७ मध्ये ओम पुरी यांचं निधन झालं. ट्यूबलाइट सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वी हृदयविकाराच्या धक्क्याने ओम पुरी यांचं निधन झालं.
रिमा लागू यांनी सलमानसोबत अनेक सिनेमांत काम केलं. हम साथ साथ है, साजन, मैंने प्यार किया, कुछ कुछ होता है आणि जुडवा या हिट सिनेमांत काम केलं. रिमा यांनी सलमानच्या आईचीच भूमिका साकारली. २०१७ मध्ये रिमा यांचं निधन झालं.
सलमान आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांनीही मैंने प्यार किया. साजन, हम आपके हैं कौन, हम तुम्हारे हैं सनम आणि जानम समझा करो या सिनेमांत काम केलं. २००४ मध्ये लक्ष्मीकांतं यांनी अखेरचा श्वास घेतला.
सलमान खानने बीवी हो तो ऐसी सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. या सिनेमात त्याच्यासोबत फारुक शेक होते. फारुक यांनी सलमानच्या मोठ्या भावाची भूमिका साकारली होती. २०१३ मध्ये त्यांचं निधन झालं.
रेस- ३ मध्ये नरेंद्र झा यांनी इंटरपोल अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती. २०१८ मध्ये त्यांचं निधन झालं.