हिना खानने केली 'लॉकडाऊन देवतां'ची पूजा, VIDEO पाहून हसू नाही आवरणार

हिना खानने केली 'लॉकडाऊन देवतां'ची पूजा, VIDEO पाहून हसू नाही आवरणार

'ये रिश्ता क्या केहलाता है'च्या या अभिनेत्रीने भन्नाट क्वारंटाइन व्हिडीओ शेअर केला आहे. तिने या व्हिडीओमध्ये 'लॉकडाऊनच्या देवतां'ची पूजा केली आहे.

  • Share this:

मुंबई, 04 मे : 'बिग बॉस'फेम अभिनेत्री हिना खान सोशल मीडियावर खूप सक्रीय असते. सध्या ती तिच्या क्वारंटाइनचे व्हिडीओ आणि फोटो नेहमीच शेअर करत आहे. तिच्या या फोटोंवर चाहते देखील खूप कमेंट्स करत आहे. नुकताच 'ये रिश्ता क्या केहलाता है'च्या या अभिनेत्रीने भन्नाट क्वारंटाइन व्हिडीओ शेअर केला आहे. तिने या व्हिडीओमध्ये 'लॉकडाऊनच्या देवतां'ची पूजा केली आहे. तिचा हा व्हि़डीओ पाहून तुम्हालाही पटेल तिने ज्यांना लॉकडाऊनच्या देवता म्हटलं आहे, ते बरोबर आहे. हिनाने चक्क सोशल मीडिया अ‍ॅप्सची पूजा केली आहे. यामध्ये तिने इन्स्टाग्राम, फेसबुक, ट्विटर आणि टिकटॉकच्या लोगोचे फोटो काढून त्यांची पूजा केली आहे.

 

View this post on Instagram

 

Quarantine fun #TiktokFun @indiatiktok LockDown ke Devtaaa TiktokOriginals

A post shared by HK (@realhinakhan) on

हिनाने या व्हिडीओला क्वारंटाइन फन असं कॅप्शन दिले आहे. टीव्हीची सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून हीना खानची ओळख आहे. . कधी तिच्या स्टाइल सेन्स तर कधी फिटनेसमुळे हिनाची सोशल मीडियावर चर्चा होते. क्वारंटाइनमध्ये देखील तिने अनेक व्हिडीओ पोस्ट केले आहेत. सध्या घरीच असल्यामुळे ती तिच्या भावाच्या मदतीने अनेक व्हिडीओ शूट करत असते. ये रिश्ता असो किंवा बिग बॉस हिनाने कायम तिच्या फॅन्सचे मनोरंजन केले आहे. त्याकरता तिचे चाहते देखील तिचे कायम कौतुक करत असतात. डॅमेज-2 या वेबसीरिजच्या माध्यमातून हिनाने तिचा वेब डेब्यू केला आहे. तिथे देखील तिने तिच्या अभिनयाची  चुणूक दाखवून दिली आहे.

First published: May 4, 2020, 3:31 PM IST
Tags:

ताज्या बातम्या