मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /KGF 2 Box Office: Yash चा जगभरात बोलबाला! दोनच दिवसात 'केजीएफ 2'ची डबल सेंच्युरी

KGF 2 Box Office: Yash चा जगभरात बोलबाला! दोनच दिवसात 'केजीएफ 2'ची डबल सेंच्युरी

बॉक्स ऑफिसवर एसएस राजामौलींच्या RRR नंतर (RRR Box Office Collection) आता प्रशांत नील दिग्दर्शित आणि यश कुमार स्टारर 'KGF: Chapter 2' धमाल (KGF: Chapter 2 Box Office Collection) करत आहे.

बॉक्स ऑफिसवर एसएस राजामौलींच्या RRR नंतर (RRR Box Office Collection) आता प्रशांत नील दिग्दर्शित आणि यश कुमार स्टारर 'KGF: Chapter 2' धमाल (KGF: Chapter 2 Box Office Collection) करत आहे.

बॉक्स ऑफिसवर एसएस राजामौलींच्या RRR नंतर (RRR Box Office Collection) आता प्रशांत नील दिग्दर्शित आणि यश कुमार स्टारर 'KGF: Chapter 2' धमाल (KGF: Chapter 2 Box Office Collection) करत आहे.

मुंबई, 16 एप्रिल: बॉलिवूडमधील चित्रपटांपेक्षा दाक्षिणात्य चित्रपटांचा अधिक बोलबाला बॉक्स ऑफिसवर (Box Office Collection south movies) सध्या पाहायला मिळतो आहे. बॉक्स ऑफिसवर एसएस राजामौलींच्या RRR नंतर (RRR Box Office Collection) आता प्रशांत नील दिग्दर्शित आणि यश कुमार स्टारर 'KGF: Chapter 2' धमाल (KGF: Chapter 2 Box Office Collection) करत आहे. या चित्रपटाला लोकांकडून मोठा प्रतिसाद आणि दाद मिळत आहे. अभिनेता यशचा (Actor Yash KGF 2) हा अॅक्शन ड्रामा पाहण्यासाठी थिएटर्समध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. त्यामुळे या सिनेमाचे बॉक्स ऑफिस कलेक्शनही उत्तम आहे. 100 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने एका दिवसात पूर्ण खर्चापेक्षा जास्त कमाई केली आणि दुसऱ्या दिवशीही मोठा गल्ला या सिनेमाने कमावला आहे.

दुसऱ्या दिवशी  KGF 2 चा बॉक्स ऑफिसवर धुमाकुळ

प्रदर्शनानंतर केजीएफ 2 ने पहिल्या दिवशी अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड मोडून बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला. पहिल्या दिवशी या चित्रपटाने भारतात 134.5 कोटी आणि जगभरात 165-175 कोटींचा गल्ला जमवला. आता दुसऱ्या दिवसाच्या रिपोर्टनुसार सिनेमाने जवळपास दुप्पट नफा मिळवला आहे.  KGF 2 ने 2022 च्या विशू उत्सवाच्या दिवशी म्हणजेच मल्याळम नववर्षाच्या दिवशी जबरदस्त कमाई केली आहे. या खास दिवशी, या चित्रपटाने दिवशी 100 ते 115 कोटींची कमाई केली आहे.

हे वाचा-लग्नानंतर आलिया भट्टचा मराठमोळा बॉडीगार्डही भावुक; आठवणीत शेअर केला हा Photo

चित्रपटाचे हिंदी व्हर्जन ठरतंय जबरदस्त

या चित्रपटाने आतापर्यंत दोन दिवसांत 265-280 कोटी रुपयांचे वर्ल्डवाइड कलेक्शन केले आहे. दुसऱ्या दिवशी, KGF-2 च्या हिंदी व्हर्जनने 45 ते 47 कोटी रुपयांची कमाई केली आणि केवळ एका दिवसात सिनेमाच्या हिंदी व्हर्जनने 98-100 कोटी रुपयांचा व्यवसाय केला. तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी हा चित्रपट आपला व्यवसाय आणखी वाढवेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे, कारण विकेंडचे दोन दिवस आहेत. यामुळे या दोन दिवसांत चित्रपट 500 कोटींचा आकडा पार करू शकतो. बहुतांश थिएटरमध्ये या सिनेमासाठी हाउसफुल्लचा बोर्ड लागत आहे, त्यामुळे आज आणि उद्या केजीएफ 2 किती कमाई करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

First published:
top videos

    Tags: Entertainment, Movie review, South film