मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /लाखो रुपये कमाई अन् हुंड्यासाठी बायकोचा छळ, कोर्टाचे अभिनेत्याला शरण येण्याचे आदेश

लाखो रुपये कमाई अन् हुंड्यासाठी बायकोचा छळ, कोर्टाचे अभिनेत्याला शरण येण्याचे आदेश

दोन वर्षांपूर्वी त्यांचं लग्न झालं. लग्न झाल्यापासून आदित्य तिच्याकडे हुंड्याची मागणी करत आहे.

दोन वर्षांपूर्वी त्यांचं लग्न झालं. लग्न झाल्यापासून आदित्य तिच्याकडे हुंड्याची मागणी करत आहे.

दोन वर्षांपूर्वी त्यांचं लग्न झालं. लग्न झाल्यापासून आदित्य तिच्याकडे हुंड्याची मागणी करत आहे.

मुंबई 10 जुलै: प्रसिद्ध टीव्ही अभिनेता आदित्य जयन (Adithyan Jayan) याला केरळ उच्च न्यायालयानं आत्मसमर्पण करण्याचे आदेश दिले आहेत. (Kerala HC) पत्नीनं त्याच्या विरोधात कौटुंबीक हिंसाचाराचे आरोप केले आहेत. (dowry harassment case) या प्रकरणी पोलिसांनी त्याला चौकशीसाठी बोलावलं होतं. परंतु तो पोलिसांना कुठल्याही प्रकारचं सहकार्य करत नाहिये. परिणामी आता थेट कोर्टानंच त्याला आत्मसमर्पण करण्याचे आदेश दिले आहेत.

असं हे बॉलिवूड! ‘दिलीपकुमार यांचं सकाळी निधन अन् नीतू कपूर यांनी रात्री केली पार्टी’

आदित्यची पत्नी अम्बिली देवी ही देखील एक अभिनेत्री आहे. दोन वर्षांपूर्वी त्यांचं लग्न झालं. लग्न झाल्यापासून आदित्य तिच्याकडे हुंड्याची मागणी करत आहे. परंतु तिने हुंडा देण्यास साफ नकार दिला. परिणामी तो तिचा शारीरिक आणि मानसिक छळ करत असल्याचा आरोप अम्बिलीने केला आहे. शिवाय आदित्यने तिचे सोन्याचे दागिने आणि 10 लाख रुपये गडप केल्याचा आरोपही तिने तक्रारीत केला आहे. पोलिसांनी या प्रकरणी त्याची चौकशी करण्याचा प्रयत्न केला. परंतु तो कुठल्याही प्रकारचं सहकार्य करण्यास तयार नाही. पत्नीने केलेल आरोप खोटे आहेत एवढंच तो वारंवार सांगतोय अशी तक्रार पोलिसांनी कोर्टात केली. परिणामी केरळ उच्च न्यायालयानं त्याला समर्पण करण्याचे आदेश दिले आहेत.

‘पोलिसांनी राईचा पर्वत केला’; अटकेप्रकरणी जिमी शेरगीलनं केले उलट आरोप

येत्या 13 जुलै पर्यंत त्यानं स्वत:हून पोलिसांच्या हवाली व्हावं असे आदेश कोर्टानं जारी केले आहेत. अर्थात 1 लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर त्याला जामीन मिळू शकतो. परंतु पुराव्यांसोबत त्याला छेडछाड करता येणार नाही. शिवाय जर त्याने साक्षीदारांना धमकवण्याचा किंवा पत्नीच्या कामात अडथळे आणण्याचा प्रयत्न केला तर त्याला कडक शासन केलं जाईल अशा इशारा देखील देण्यात आला आहे. आदित्यच्या या प्रकरणामुळे दाक्षिणात्य मनोरंजनसृष्टीत अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

First published:

Tags: Crime, Entertainment, Tv actor