मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /बेरोजगार प्रीतम कसा झाला सुपरस्टार? पाहा सलमान खाननं केली होती अशी मदत

बेरोजगार प्रीतम कसा झाला सुपरस्टार? पाहा सलमान खाननं केली होती अशी मदत

जेव्हा त्याला कोणीच काम देण्यास तयार नव्हतं. त्यावेळी बॉलिवूडच्या भाईजाननं (Salman Khan) त्याला मदतीचा हात दिला अन् आज तो एक लोकेप्रिय गायक म्हणून ओळखला जातो.

जेव्हा त्याला कोणीच काम देण्यास तयार नव्हतं. त्यावेळी बॉलिवूडच्या भाईजाननं (Salman Khan) त्याला मदतीचा हात दिला अन् आज तो एक लोकेप्रिय गायक म्हणून ओळखला जातो.

जेव्हा त्याला कोणीच काम देण्यास तयार नव्हतं. त्यावेळी बॉलिवूडच्या भाईजाननं (Salman Khan) त्याला मदतीचा हात दिला अन् आज तो एक लोकेप्रिय गायक म्हणून ओळखला जातो.

मुंबई 13 जून: ‘जरासा’, ‘हम है गलत’, ‘भीगी भीगी सी’, ‘तू ही मेरी शब है’ यांसारख्या अनेक सुपरहिट गाण्यांची निर्मिती करणारा प्रीतम (Pritam Chakraborty) हा बॉलिवूडमधील एक नामांकित संगीतकार म्हणून ओळखला जातो. प्रीतमचा आज वाढदिवस आहे. (Pritam Chakraborty birthday) 50 व्या वाढदिवसाच्या निमित्तानं देशभरातील चाहत्यांनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. प्रीतमनं आपल्या अनोख्या संगीतशैलीच्या जोरावर बॉलिवूडमध्ये स्वत:चं असं एक वेगळं स्थान प्रस्थापित केलं आहे. गेली दोन दशकं तो सातत्यानं विविध गाण्यांच्या माध्यमातून रसिकांचं मनोरंजन करत आहे. परंतु तुम्हाला वाचून आश्चर्य एक काळ असाही होता. जेव्हा त्याला कोणीच काम देण्यास तयार नव्हतं. त्यावेळी बॉलिवूडच्या भाईजाननं (Salman Khan) त्याला मदतीचा हात दिला अन् आज तो एक लोकेप्रिय गायक म्हणून ओळखला जातो.

प्रीतमचा जन्म 1971 साली कोलकातामधील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला होता. लहानपणापासूनच त्याला गायनाची प्रचंड आवड होती. शिवाय घरातही संगीताचं वातावरण होतं. आई-वडिल दोघांनाही शास्त्रीय संगीताची आवड होती. त्यामुळं प्रीतमला घरातच संगीताचे प्राथमिक धडे गिरवता आले. शाळा आणि कॉलेजमधील संगीत कार्यक्रमांमध्ये भाग घेत प्रीतमनं आपल्या करिअरची सुरुवात केली. तिथे त्याला खूप चांगलं यश संपादन करता आलं. त्यामुळं त्याच्या मित्र-मंडळींनी त्याला बॉलिवूडमध्ये आपलं नशीब आजमवण्याचा सल्ला दिला. अन् त्यांच्या प्रोत्साहानामुळंच तो काम मिळवण्यासाठी मुंबईत आला. इथे आला तेव्हा त्यानं तयार केलेली काही गाणी त्याच्याजवळ होती.

‘तू चूकीच्या माणसाशी पंगा घेतलास’; अभिनेत्याची सलमान खानला धमकी

परंतु मुंबईत येताच त्याच्या हाती निराशा लागली. त्यानं कित्येक संगीतकारांची, निर्मात्यांची, गायकांची, अभिनेत्यांची दारं ठोठावली. परंतु त्याच्या हाती निराशाच आली. कोणीही त्याला काम देण्यास तयार नव्हतं. स्ट्रगल सुरु असताना ‘तेरे लिये’, ‘स्टँपॅड’, ‘अग्निपंख’, ‘फंटुश’, ‘रघु रेमो’ यांसारख्या काही कमी बजेटच्या चित्रपटांमध्ये त्याला एक-दोन गाणी देण्याची संधी मिळाली. या चित्रपटांच्या निमित्तानंच त्याची ओळख सलमान खानशी झाली. अन् सलमान त्याचं काम पाहून प्रभावीत झाला. सलमाननं त्याला मदत करण्याचं वचन दिलं. अन् तिथूनच प्रीतमच्या करिअरनं खऱ्या अर्थानं वळण घेतलं.

'नागिन'चा Black and white अवतार; पाहा हिना खानचे Bold Photo

सलमाननं ‘मेरे यार की शादी है’ हा यशराज बॅनरचा बिग बजेट चित्रपट त्याला मिळवून दिला. त्यानंतर धुम या आणखी एका चित्रपटासाठी त्याचं नाव सुचवलं. अन् या चित्रपटामुळं प्रीतम खऱ्या अर्थानं प्रसिद्ध झाला. त्यानं धुमसाठी तय़ार केलेली गाणी त्यावेळी सुपरहिट ठरली होती. शिवाय त्याचं म्युझिक देखील आजही कित्येक ठिकाणी वाजवलं जातं. अशा प्रकारे सलमाननं प्रीतमला मदतीचा हात दिला अन् आज तो यशाच्या शिखरावर पोहोचला आहे.

First published:
top videos

    Tags: Bollywood, Salman khan, Song