जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Indian Idol च्या ऑडिशनमध्ये स्पर्धकानं नेहा कक्करला जबरदस्तीनं KISS केलं आणि...

Indian Idol च्या ऑडिशनमध्ये स्पर्धकानं नेहा कक्करला जबरदस्तीनं KISS केलं आणि...

Indian Idol च्या ऑडिशनमध्ये स्पर्धकानं नेहा कक्करला जबरदस्तीनं KISS केलं आणि...

रिअलिटी शो इंडियन आयडॉलचा 11 वा सीझन लवकरच सुरू होत असून या ऑडिशनमध्ये पोहोचलेल्या एका स्पर्धकानं नेहा कक्करला जबरदस्तीनं किस करण्याचा प्रयत्न केला.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 17 ऑक्टोबर : रिअलिटी शो ‘इंडियन आयडॉल’चा 11 वा सीझन लवकरच सुरू होत आहे. यावेळी या शोमध्ये नेहा कक्कर, विशाल ददलानी आणि अनु मलिक परिक्षक म्हणून काम पाहत आहेत. तर आदित्य नारायण या शोचं होस्टिंग करणार आहे. सध्या या शोची ऑडिशन सुरू असून या ऑडिशनमध्ये पोहोचलेल्या एका स्पर्धकानं नेहा कक्करला जबरदस्तीनं किस करण्याचा प्रयत्न केला. सोनी टीव्हीच्या ऑफिशिअल इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये सर्व स्पर्धकांच्या ऑडिशनची झलक पाहायला मिळत आहे. सर्व स्पर्धकांच्या परफॉर्मन्सवर परिक्षक खूप खूश आहेत. पण व्हिडीओच्या शेवटी एक स्पर्धक खूप सारे गिफ्ट घेऊन पोहोचतो. हे सर्व गिफ्ट नेहाला देतो. नेहा त्यावर खूश होऊन त्याला मिठी मारते. पण एवढ्यात तो नेहाला गालावर किस करतो. शो होस्ट आदित्य नारायण त्याला थांबवण्याचा प्रयत्न करतो आणि नेहा सुद्धा लगेचच तिथून बाजूला होते. या घटनेमुळे दुसरे परिक्षकही हैराण होतात. प्रियांकाच्या सिनेमातील ‘या’ सीनमुळे निकला कोसळलं होतं रडू!

जाहिरात

इंडियान आयडॉलच्या 11 व्या सीझनच्या ऑडिशन दरम्यान एका स्पर्धकाचं गाणं ऐकून नेहा कक्करला अश्रू अनावर होतात. याचं कारण असतं या स्पर्धकासोबत घडलेली घटना. ऑडिशन राउंडमध्ये स्पर्धक अविनाशला पाहिल्यावर नेहा विचारते तुझ्या चेहऱ्यावर हे डाग कशाचे आहेत. काही अपघात झाला होता का? त्यावर अविनाश सांगतो. माझा चेहरा जळला होता आणि ही आग मी स्वतःच लावली होती. मी पाहू शकत नाही. यामुळे कंटाळून मी स्वतःला आग लावली. OMG! भावाला मुलींसोबत डान्स करताना पाहून नेहा कक्करनं काढली चप्पल या ऑडिशनमध्ये अविनाशनं गायक राहत फतेह अली खान याचं ‘तू ना जाने आस-पास है खुदा’ हे गाणं गायलं होतं. अविनाश यांचं गाणं ऐकल्यावर नेहा रडू लागली. त्याचं गाणं संपल्यावर विशाल सांगतो, तुझ्या गाण्यामुळे आज मला या गाण्याचा अर्थ समजला. त्यासाठी धन्यवाद. तर नेहा म्हणते, तो काळ किती कठीण होता असेल जेव्हा तू स्वतःला जाळून घेण्याचा विचार केला होतास. Bigg Bossच्या घरातून बाहेर पडल्यावर कोएना मित्रानं सलमानवर केले गंभीर आरोप ========================================================= VIDEO: अजगराच्या विळख्यातून मजुराच्या सुटकेचा थरार

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात