'या' साेप्या प्रश्नावर स्पर्धक KBC 11 मधून बाहेर, तुम्हाला माहित आहे का उत्तर?

'या' साेप्या प्रश्नावर स्पर्धक KBC 11 मधून बाहेर, तुम्हाला माहित आहे का उत्तर?

अंकितानं घाईघाईत एक अशी चूक केली ज्यामुळे तिला या खेळातून बाहेर व्हावं लागलं.

  • Share this:

मुंबई, 22 नोव्हेंबर : अमिताभ बच्चन यांचा क्वीज शो केबीसी 11च्या नुकत्याच प्रसरित झालेल्या एपिसोडमध्ये अंकिता कौल हिनं हजेरी लावली. याआधीच्या एपिसोडमध्ये अंकितानं तिचा परिचय दिला होता. यावेळी तिनं सांगितलं की ती तिच्या पतीसाठी या शोमध्ये आली आहे. मागच्या एपिसोडमध्ये अंकिताचा खेळ 2 हजार रुपयांच्या प्रश्नावर थांबवण्यात आला. त्यानंतर आजच्या एपिसोडमध्ये पुढचे प्रश्न सुरू झाले. अंकिताचा पहिला प्रश्न बॉलिवूडशी संबिधित होता. ज्यावर अंकितानं ऑडियन्स पोलची लाइफ लाइन घेतली. एवढंच नाही तर तिनं त्यानंतरच्या सलग तिन्ही प्रश्नांसाठी लाइफ लाइनचा वापर केला आणि यातच तिनं घाईघाईत एक चूक केली ज्यामुळे तिला या खेळातून बाहेर व्हावं लागलं.

केबीसी 11 मध्ये एका प्रश्नसाठी अंकिता यांना फुलाचा फोटो दाखवण्यात आला आणि त्यांना या फुलाचं नाव विचारण्यात आलं. या प्रश्नावर अंकिता गोंधळल्या आणि त्यांनी लगेचच फ्लिप द क्वेश्चन ही लाइफ लाइन घेतली. जेव्हा अमिताभ यांनी ऑडियन्ससाठी या प्रश्नाचं उत्तर देण्यास सांगितलं तर त्यांनी गुलमोहर असं त्या फुलाचं नाव सांगितलं. आश्चर्याची बाब म्हणजे हे उत्तर बरोबर होतं. त्यामुळे अचूक उत्तर माहित असूनही घाई केल्यानं त्यांची एक लाइफलाइन वाया गेली.

टीव्हीची प्रसिद्ध अभिनेत्री व्हेंटीलेटरवर, शूटिंग दरम्यान सेटवरच कोसळली

यानंतर अंकिताकडे कोणतीही लाइफलाइन शिल्लक राहिली नव्हती. त्यामुळे अमिताभ बच्चन यांनी त्यांनी सांभाळून खेळण्याचा सल्लाही दिला. त्यानंतर अंकितानं खूप चांगला खेळ केला मात्र एका अशा प्रश्नावर ती अडखळली की तिला शो सोडावा लागला. हा प्रश्न होता, सचिन तेंडुलकर, जावेद मियादाद आणि सनथ जयसूर्या यांच्या व्यतिरिक्त असा कोणाता खेळाडू आहे ज्याचं क्रिकेट करिअर 20 वर्षांपेक्षा जास्त आहे. पण अंकिता या प्रश्नाचं उत्तर देऊ शकली नाही आणि तिनं खेळ क्विट केला. तिनं या खेळात फक्त 1 लाख 60 हजार रुपये जिंकले. या प्रश्नाचं उत्तर होतं मिताली राज.

'तारक मेहता...' आणखी एक धक्का, आता 'या' अभिनेत्रीनं सोडला शो

अंकिता नंतर फास्टेस्ट फिंगर क्रॉस करुन पश्चिम बंगालची स्पर्धक संगीता चौधरी हॉटसीटवर पोहोचली. पण ती सुद्धा फक्त 5 हजार रुपयांच्या चौथ्या प्रश्नापर्यंत खेळू शकली. ज्यानंतर हूटर वाजला आणि संगीता रोल ओव्हर स्पर्धक झाली.

सलमानच्या वाढदिवसाला अर्पिता खान देणार दुसऱ्या बाळाला जन्म? वाचा काय आहे सत्य

========================================================================

Published by: Megha Jethe
First published: November 22, 2019, 6:07 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading