मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Kaushal Inamdar: 'रिऍलिटी शो'मध्ये गाणाऱ्या गायकांचं पुढे काय होतं? कौशल इनामदार यांची पोस्ट चर्चेत

Kaushal Inamdar: 'रिऍलिटी शो'मध्ये गाणाऱ्या गायकांचं पुढे काय होतं? कौशल इनामदार यांची पोस्ट चर्चेत

मराठी सिनेसृष्टीत कौशल इनामदार यांना एक प्रचलित गायक आणि संगीतकार म्हणून ओळखलं जातं. सध्या कौशल रिऍलिटी शोबद्दल सूचक मत मांडताना दिसून आले आहेत.

मराठी सिनेसृष्टीत कौशल इनामदार यांना एक प्रचलित गायक आणि संगीतकार म्हणून ओळखलं जातं. सध्या कौशल रिऍलिटी शोबद्दल सूचक मत मांडताना दिसून आले आहेत.

मराठी सिनेसृष्टीत कौशल इनामदार यांना एक प्रचलित गायक आणि संगीतकार म्हणून ओळखलं जातं. सध्या कौशल रिऍलिटी शोबद्दल सूचक मत मांडताना दिसून आले आहेत.

  • Published by:  Rasika Nanal

मुंबई 06 ऑगस्ट: रिऍलिटी शो आणि गायक यांचं एक खास नातं आहे. सध्या अनेक वहिन्यांवर प्रसिद्ध होणारे रिऍलिटी शो हे चर्चेचा विषय असतात. यातच गायक संगीतकार कौशल इनामदार यांनी गायनाशी आणि रिऍलिटी शो शी निगित एक फेसबुक पोस्ट शेअर केली असून त्याने एका नव्या चर्चेची सुरुवात होताना दिसत आहे.

रिऍलिटी शोमध्ये गाणाऱ्या गायकाचं पुढे काय होतं यावर सखोल प्रकाश टाकणारी ही एक पोस्ट असून यामध्ये कौशल यांनी गायकांना नेमक्या कशा परिस्थितीला तोंड द्यावं लागतं याबद्दल सांगितलं आहे. तसंच एखाद्या इतर गायकाने गायलेलं गाणं सादर करणं आणि स्वतःच्या आवाजावर मेहनत घेऊन एक नवं गाणं रेकॉर्ड करणं यामध्ये किती मोठी तफावत आहे याबद्दल सुद्धा आणि नेमकेपणाने त्यांनी मत मांडलं आहे.

ते असं म्हणतात, “Reality Shows मध्ये येणाऱ्या गायकांचं नंतर पुढे काय होतं? हा प्रश्न मला अनेकदा अनेक लोकांनी विचारला आहे. त्यातले काही गायक आपल्याला दिसतात आणि काही लोकांची नावं नंतर फारशी ऐकली जात नाहीत. खरं तर या कार्यक्रमांतून झळकलेले सर्व गायक हे आपल्याला रोज दिसत नसले तरी त्यांचं बरं चाललं असतं. काही गायक पार्श्वगायक होण्याचं त्यांचं स्वप्न पूर्ण करतात, काही कार्यक्रमांमधून गातात, काही संगीताशी निगडीत इतर व्यवसायात जातात, आणि काही लोक इतर कामं स्वीकारून संगीताचा एक हॉबी म्हणून स्वीकार करतात. Water finds its own level या सिद्धांताप्रमाणेच प्रत्येक गायक आपापली जागा गाठून त्या जागेत सेटल होतो.

हे ही वाचा- Shruti Marathe: 'राधा ही बावरी' फेम अभिनेत्री नवऱ्यासह करतेय 'या' मालिकेची निर्मिती

अर्थात काही स्वप्नभंगही असतातच - हे आयुष्य आहे आणि स्वप्नभंगाचं दुःख कुणाला चुकलंय? या स्वप्नभंगाचं एक कारण असं आहे की या कार्यक्रमांतून स्पर्धक इतर गायकांची गाणी समर्थपणे सादर करतात परंतु एखाद्या गायकाने गाऊन ठेवलेलं गाणं आणि आपण आपलं स्वतःचं गाणं म्हणणं यात जमीन-अस्मानाचा फरक आहे. इतर कुठल्याही गायकाची छाप त्या गाण्यावर नसताना, थेट संगीतकाराकडून गाणं शिकून ते सादर करणं ही एक वेगळी कला आहे. शिवाय कार्यक्रमात गाणं म्हणणं, स्पर्धेत गाणं सादर करणं याचा skillset आणि गाणं एखाद्या recording studioमध्ये ते गाणं ध्वनिमुद्रित करणं - हा पूर्णतः वेगळं कौशल्य लागणारा अनुभव आहे.”

सध्या कौशल इनामदार गायक संगीतकार अवधूत गुप्तेसह एका नव्या प्रोजेक्टची सुरुवात करताना दिसणार आहेत. त्यांचा हा नवा प्रयोग अनुभवायला सगळेच प्रेक्षक आतुर झाल्याचं समजत आहे.

First published:

Tags: Colors marathi, Marathi entertainment, Reality show, Singer