अनेक मालिका आणि सिनेमांतून आपल्या अभिनयाची मोहोर उमटवलेली अभिनेत्री श्रुती मराठे तिचा नवरा गौरव घाटणेकर सह एका नव्या रूपात प्रेक्षकांसमोर येणार आहे.
2/ 9
श्रुती मराठेचं झी मराठीशी एक घट्ट नातं असून राधा ही बावरी या झी मराठीवरील मालिकेने तिला बरीच लोकप्रियता मिळवून दिली होती.
3/ 9
आता झी मराठीवरील एका नव्या मालिकेची निर्मिती करताना श्रुती दिसून येणार आहे.
4/ 9
झी मराठीवर येत्या आठवड्यात नवा गडी नवं राज्य ही मालिका दाखल होणार असून गौरव आणि श्रुती या मालिकेची निर्मिती करताना दिसणार आहेत.
5/ 9
श्रुती आणि गौरव या मालिकेच्या निमित्ताने एक निर्माते म्हणून समोर येणार असून त्यांना या नव्या भूमिकेत बघायला सगळेच उत्सुक आहेत.
6/ 9
गौरव आणि श्रुती दोघेही वर्क फ्रंटवर सध्या बरेच ऍक्टिव्ह असून दोघेही मालिका आणि सिनेमांमध्ये काम करताना दिसत आहेत.
7/ 9
नवा गडी नवं राज्य या मालिकेबद्दल सांगायचं झालं तर ही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला 8 ऑगस्ट पासून येणार आहे. रमा आणि आनंदीच्या संसाराची गोड गोष्ट प्रेक्षकांच्या भेटीला येत असून मालिकेचं कथानक फारच आकर्षक आहे.
8/ 9
ह्या मालिकेत प्रमुख भूमिकेत अनिता दाते , पल्लवी पाटील आणि कश्यप परुळेकर सोबतच साईशा भोईर असणार आहेत. सौजन्य (झी मराठी इन्स्टाग्राम)
9/ 9
या मालिकेचा भव्य प्रीमियर सोहळा नुकताच पार पडला असून संपूर्ण टीमने या दरम्यान हजेरी लावल्याचं दिसून आलं आहे.