मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

kaun Banega Crorepati 14 'या' तारखेपासून होणार सुरु, बक्षिसाच्या रकमेत केली मोठी वाढ

kaun Banega Crorepati 14 'या' तारखेपासून होणार सुरु, बक्षिसाच्या रकमेत केली मोठी वाढ

'कौन बनेगा करोडपती' चा पुढचा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे केबीसीच्या चाहत्यांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे.

'कौन बनेगा करोडपती' चा पुढचा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे केबीसीच्या चाहत्यांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे.

'कौन बनेगा करोडपती' चा पुढचा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे केबीसीच्या चाहत्यांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे.

  • Published by:  Sayali Zarad
मुंबई, 29 जुलै : सोनी टीव्हीवर प्रदर्शित होणारा रिअॅलिटी क्विझ शो 'कौन बनेगा करोडपती' (Kon Banega Karodpati)भारतातील अनेकांचा आवडता शो आहे. दरवर्षी चाहते मोठ्या आतुरतेनं या क्विझ शोची वाट पाहत असतात. फक्त मनोरंजनच नाही तर या शोमधून ज्ञानातही भर पडते. त्यामुळे जवळपास सगळ्याच वयोगटातले लोक हा शो बघण्यास प्राधान्य देतात. आत्तापर्यंत या शोचे 13 सीझन यशस्वीरित्या पूर्ण झाले आहेत. अशातच 'कौन बनेगा करोडपती' चा पुढचा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे केबीसीच्या चाहत्यांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन 'कौन बनेगा करोडपती' कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची धुरा सांभाळताना दिसतात. पुढच्या सीझनची म्हणजेच 'कौन बनेगा करोडपती 14' च्या सूत्रसंचालनाची जबाबदारीही तेच पेलवताना दिसणार आहेत. अलीकडेच, निर्मात्यांनी सोशल मीडियावर एका पोस्टद्वारे केबीसी 14 च्या प्रीमियरची तारीख जाहीर केली आहे. सोनी टीव्हीने माहिती दिली की कौन बनेगा करोडपतीचा नवीन अध्याय रविवार 7 ऑगस्ट रोजी रात्री 9 वाजता सुरू होईल. त्याचा प्रीमियर देखील खूप धमाकेदार असेल, ज्यामध्ये केवळ बॉलिवूड सेलिब्रिटीच नाही तर देशातील इतर सेलिब्रिटी देखील दिसणार आहेत. हेही वाचा -  'सुंदरा मनामध्ये भरली' फेम अभिनेत्रीसोबत घडला धक्कादायक प्रकार; पोलिसांत पोहोचलं प्रकरण 'कौन बनेगा करोडपती' चा प्रिमियर प्रदर्शित झाल्यानंतर एक आठवडा भारताच्या स्वातंत्र्याचा उत्सव म्हणून साजरा केला जाईल, कारण या वर्षी 15 ऑगस्ट रोजी देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होतील. त्यामुळे पहिला आठवडा चांगलाच मनोरंजक असणार आहे. नव्या सीझनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक कलाकार सहभागी होणार आहेत.  या खास लोकांमध्ये प्रसिद्ध बॉक्सर मेरी कोम, फुटबॉलपटू सुनील छेत्री, अभिनेता आमिर खान, कारगिल युद्धातील शूर सैनिक डीपी सिंह आणि इतर अनेक दिग्गज स्टार्सचा समावेश आहे. दरम्यान, 'कौन बनेगा करोडपती' मागच्या सीझनमध्ये बक्षीस रक्कम 7 कोटी होती. या नव्या सीझनमध्ये या रकमेतही वाढ झालीआहे. या वर्षी ती 7.5 कोटी रुपये आहे. शेवटच्या 7.5 कोटी प्रश्नाचे उत्तर देऊ शकत नसलेल्यांना 75 लाख रुपये घरी घेऊन जाता येणार आहे.
First published:

Tags: Amitabh Bachchan, Bollywood actor, Bollywood News, Entertainment, Sony tv

पुढील बातम्या