मुंबई, 29 जुलै- मनोरंजनसृष्टीतील कलाकारांना ट्रोल करणं, धमकी देणं, त्यांच्याबाबत अपमानास्पद आणि निंदनीय वक्तव्य करणं अशी प्रकरणे हल्ली वाढलेली दिसत आहेत. सतत कोणत्या ना कोणत्या कलाकाराला या सर्व प्रकरणांना सामोरं जावं लागतं. असंच काहीसं एका मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत घडलं आहे. ही अभिनेत्री इतर कुणी नसून ‘सुंदरा मनामध्ये भरली’ फेम ‘कामिनी’ अर्थातच पूजा पुरंदरे होय. अभिनेत्री पूजा पुरंदरेलासुद्धा ‘सायबर अब्युझिंग’ला सामोरं जावं लागलंय. इतकंच नव्हे तर हे प्रकरण आता पोलिसांपर्यंत पोहोचलं आहे. अभिनेत्री स्वतः आपल्या सोशल मीडिया पोस्टद्वारे याबाबत खुलासा केला आहे. सोबतच सर्वांना खास विंनतीदेखील केली आहे. अभिनेत्रीची ही पोस्ट पाहून काही जणांकडून सोशल मीडियाचा गैरवापर होतोय की काय? असा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे. अभिनेत्री पूजा पुरंदरे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती सतत आपले फोटो आणि व्हीईदो शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात असते. मात्र नुकतंच अभिनेत्रीला सोशल मीडियाचा वाईट अनुभव आला. याबाबत सांगताना अभिनेत्रीने लिहलंय, ‘गेल्या काही दिवसांपासून मला इन्स्टाग्रामवर अनेक डीएम्स आणि पोस्ट टॅग्स मिळत आहेत. किंवा एका विशिष्ट अकाउंटवरुन मला स्टोरीला किंवा पोस्टला टॅग केलं जात आहे. जे खूप निंदनीय,अपमानास्पद आणि धमकीवजा होतं. सुरुवातीला मी या गोष्टीला हलक्यात घेतलं, त्याकडे दुर्लक्ष केलं. मला वाटलं की या इंडस्ट्रीमध्ये काम करण्याचे हेसुद्धा काही परिणाम आहेत’.
अभिनेत्रीने पुढे लिहलंय, ‘मला वाटतं प्रत्येकाने कधी ना कधी ट्रोलिंगसारख्या प्रकाराला तोंड दिलं असावं. परंतु काल मी फारच निराश झाले. मला प्रचंड दुःख झालं. आणि मी ठरवलं आता आणखी या सर्व गोष्टींना सहन करायचं नाही. आणि मी मोठा निर्णय घेत त्या व्यक्ती विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. कारण त्या व्यक्तीने माझी इमेज खराब करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच अभिनेत्रीने आवाहन करत म्हटलं कृपा करून अशा गोष्टी सहन करु नका. आणि इतरांवर बोलण्यापेक्षा स्वतःबाबत बोला. आणि नेहमी आनंद पसरवत राहा’. (हे वाचा:
PHOTOS: ‘तेरा यह इश्क़ मेरा फ़ितूर ‘, कुणाच्या प्रेमात पडली प्राजक्ता माळी?
) पूजा पुरंदरे ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेतून कामिनीच्या रुपात घराघरात पोहोचली होती. मात्र काही दिवसांपूर्वी अभिनेत्रीने ही मालिका सोडली होती. परंतु ती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते.सध्या अभिनेत्रीने स्टार प्रवाहच्या ‘सहकुटुंब सहपरिवार’ मालिकेत एन्ट्री घेतली आहे.