मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /लग्नामध्ये पंजाबी बोलत होती वहिनी कतरिना! विकीच्या बहिणीचा खुलासा

लग्नामध्ये पंजाबी बोलत होती वहिनी कतरिना! विकीच्या बहिणीचा खुलासा

बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ   (Katrina Kaif), आणि विकी कौशल   (Vicky Kaushal)   यांचा भव्य विवाह सोहळा नुकताच पार पडला. या सोहळ्याबाबत बरीच गुप्तता पाळण्यात आली होती. तरीही, दोघांचे हॉटेलमधील फोटो लीक झाल्यानंतर, सायंकाळी स्वतःच कतरिना आणि विकीने आपल्या लग्नाचे फोटो   (Vicky Katrina wedding pics)   इन्स्टाग्रामवर पोस्ट केले होते.

पुढे वाचा ...

     मुंबई,14 डिसेंबर-   बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ   (Katrina Kaif), आणि विकी कौशल   (Vicky Kaushal)   यांचा भव्य विवाह सोहळा नुकताच पार पडला. या सोहळ्याबाबत बरीच गुप्तता पाळण्यात आली होती. तरीही, दोघांचे हॉटेलमधील फोटो लीक झाल्यानंतर, सायंकाळी स्वतःच कतरिना आणि विकीने आपल्या लग्नाचे फोटो   (Vicky Katrina wedding pics)   इन्स्टाग्रामवर पोस्ट केले होते. यानंतर आता विकी कौशलची चुलत बहीण उपासना वोहरा (Upasana Vohra) हिने लग्नाच्या काही खास गोष्टी सर्वांसोबत शेअर केल्या आहेत. यात तिने सांगितले, की कतरिना ही लग्नात पूर्णवेळ पंजाबीमध्येच  (Katrina talking Punjabi)  बोलत होती.

    या दोघांचा विवाह सोहळा (Vicky Katrina wedding ceremony) आता पार पडला असला, तरी लग्नामध्ये नेमकं काय-काय झालं, कशा प्रकारचा हा सोहळा होता याची उत्सुकता अजूनही फॅन्सना आहेच. लग्नातील फोटो किंवा व्हिडिओ बाहेर लीक होऊ नयेत यासाठी मोठ्या प्रमाणात खबरदारी बाळगण्यात आली होती. या लग्नाला येणाऱ्या पाहुण्यांना मोबाईल फोनदेखील हॉटेलच्या रुममध्ये ठेवण्याची सक्ती करण्यात आली होती. त्यामुळे लग्नसोहळा नेमका कसा पार पडला याबाबत नेटीझन्सना कमालीची उत्सुकता लागून राहिली आहे. यातच, विकी कौशलची कझिन (Vicky Kaushal’s cousin sister) उपासना वोहराने या लग्नातील बऱ्याच गोष्टींबाबत माहिती दिली. इंडिया टुडेने याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले आहे.

    उपासनाने इन्स्टाग्रामवर केलेल्या लाईव्हमध्ये या लग्नाबाबत विचारण्यात आलेल्या काही प्रश्नांची उत्तरे दिली. ती आपल्या फॉलोवर्ससोबत संवाद साधत होती. यावेळी एका इन्स्टाग्राम यूझरने तिला विचारले, की कतरिना लग्नाच्या वेळी पंजाबीमध्ये बोलली का? त्यावर उपासना म्हणाली, “हो. लग्नामध्ये पूर्ण वेळ ती पंजाबी भाषेमध्येच (Katrina spoke only Punjabi throughout wedding) बोलत होती.” यावेळी दुसऱ्या एका इन्स्टा यूझरने विचारले की कतरिनाला भेटून तुला कसं वाटलं? त्यावर हा एक छान अनुभव होता, असं उपासना म्हणाली. आणखी एका यूझरने कतरिनाच्या कुटुंबाबाबत विचारपूस केली, त्यावर ते सगळे अतिशय छान आहेत, असं उपासनाने सांगितले.

    कतरिनाच्या गिफ्टने भारावून गेली उपासना

    दरम्यान, कतरिनाने उपासनाला लग्नामध्ये एक गिफ्टदेखील (Katrina Gift to Vicky family members) दिलं होतं. उपासनाने या गिफ्टचा फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट करत कतरिनाचे आभार मानले. “धन्यवाद वहिनी. तू ज्याप्रकारे नात्यातील बंध मजबूत करण्यासाठी मेहनत घेतेस ते खरंच प्रेरणादायी आहे. केवळ हे सांगण्यासाठी मी हे शेअर करत आहे.” अशा आशयाच्या कॅप्शनसह उपासनाने हा फोटो पोस्ट केला आहे. कतरिनाने विकीच्या इतर कुटुंबियांनाही अशा प्रकारची भेटवस्तू दिल्याचं सूत्रांनी सांगितलं.

    First published:

    Tags: Entertainment, Katrina kaif, Vicky kaushal