मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

विकी-कतरिनाच्या लग्नसोहळ्याचं Exclusive फुटेज; समोर आला हॉटेलचा INSIDE VIDEO

विकी-कतरिनाच्या लग्नसोहळ्याचं Exclusive फुटेज; समोर आला हॉटेलचा INSIDE VIDEO

 बॉलिवूड स्टार विकी कौशल   (Vicky Kaushal)   आणि कतरिना कैफ   (Katrina Kaif)   एका भव्य सोहळ्यात लग्नबंधनात अडकणार आहेत. सध्या राजस्थानमधील सवाई माधोपूर जिल्ह्यातील चौथ बरवाडा  (Chauth Barwada)   शहरात हा विवाह सोहळा सुरु आहे.

  • Published by:  Aiman Desai

मुंबई, 8 डिसेंबर-  बॉलिवूड स्टार विकी कौशल   (Vicky Kaushal)   आणि कतरिना कैफ   (Katrina Kaif)   एका भव्य सोहळ्यात लग्नबंधनात अडकणार आहेत. सध्या राजस्थानमधील सवाई माधोपूर जिल्ह्यातील चौथ बरवाडा  (Chauth Barwada)   शहरात हा विवाह सोहळा सुरु आहे. (Wedding ceremony) एका अत्याधुनिक रिसॉर्टमध्ये रूपांतरित झालेला आणि 700 वर्षांचा वारसा असलेला सिक्स सेन्सेस फोर्ट (Six Senses Fort) या नेत्रदीपक सोहळ्याचा साक्षीदार होणार आहे. नुकताच या फोर्टचे इनसाईड व्हिडीओ समोर आले आहेत. यामध्ये किल्यावर विद्युत रोषणाई केलेली दिसून येत आहे.

बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशल उद्या लग्न बंधनात अडकणार आहेत. यासाठी ते सोमवारी रात्री उशिरा जयपूरमध्ये पोहोचले होते. त्यांनतर कालपासून लग्नाआधीच्या कार्यक्रमानं सुरुवात झाली आहे. काल कतरिना कैफच्या हातावर विकीच्या नावाची मेहंदी लावण्यात आली होती. तसेच रात्री संगीत कार्यक्रमसुद्धा पार पडला. दरम्यान आज हळदी समारंभ पार पडणार आहे. विकी आणि कतरिनाने आपला लग्नसोहळा अत्यंत गोपनीय ठेवला आहे. त्यामुळे त्यांच्या लग्नातील कार्यक्रमाचे कोणतेही फोटो किंवा व्हिडीओ लीक होत नाहीयेत. त्यांत कडेकोट बंदोबस्तात हा विवाहसोहळा साजरा केला जात आहे.

मात्र नुकताच काही व्हिडीओ मीडियाच्या हाती लागले आहेत. हे व्हिडीओ सिक्स सेन्स फोर्टच्या आतील भागाचे आहेत. यामध्ये स्पष्ट काही दिसत नाहीय. मात्र हे काही दिसत आहे. त्यावरून आपण अंदाज लावू शकतो कि आतमध्ये डोळे दिपवून टाकणारी विद्युत रोषणाई केली आहे. शिवाय मोठ्या बंदोबस्तात हा कार्यक्रम या हॉटेलच्या आत पार पडत आहे.

दरम्यान एक बातमी समोर आली होती, कि अभिनेत्री लग्नानंतर विकीसोबत नवीन घरात गृहप्रवेश करणार आहे. हे नवीन घर जुहूमध्ये आहे. गेल्या काही महिन्यांपासून या दोन्ही कलाकारांनी अनेकदा घराच्या सजावटीसाठी (home decor) आणि इतर सोयी सुविधांचा आढावा घेण्यासाठी याठिकाणाला भेटी दिल्या आहेत. याच ठिकाणी ते अनेकदा एकत्र दिसले. सुरुवातीला घर पाहण्यासाठी मात्र ते सोबत गेले नव्हते. असंही सूत्रांनी सांगितलं.अगोदर हाती आलेल्या माहितीनुसार, या अपार्टमेंटसाठी 1.75 कोटी रुपयांची रक्कम डिपॉझिट म्हणून भरली आहे. जुलै 2021 पासून 5 वर्षांच्या कालावधीसाठी विकीनं हे अपार्टमेंट भाड्यानं घेतलं आहे. सुरुवातीच्या 36 महिन्यांचं भाडं 8 लाख रुपये प्रति महिना इतकं असेल. त्यानंतर एका वर्षासाठी दरमहा 8 लाख 40 हजार रुपये तर शेवटच्या वर्षासाठी दरमहा 8 लाख 82 हजार रुपये भाडं भरावं लागणार आहे.

First published:

Tags: Entertainment, Katrina kaif, Vicky kaushal