मुंबई, 14 जानेवारी- बॉलिवूडमधील (Bollywood) अनेक सेलिब्रेटी कपल्सने यंदा लग्नानंतरची पहिली लोहरी साजरी (Lohari celebration) केली. बी टाऊनमधील सर्वात सुंदर कपल्सपैकी एक असणाऱ्या कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि विकी कौशलचीसुद्धा (Vicky Kaushal) ही पहिली लोहरी होती. चाहत्यांना त्यांच्या सेलिब्रेशनची झलक पाहण्याची फारच उत्सुकता होती. कतरिना आणि विकीने आपल्या चाहत्यांसाठी आपले काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये ते दोघे उत्साहात लोहरीचा आनंद घेताना दिसून येत आहेत. अभिनेता विकी कौशल आणि कतरिना कैफ यांच्या पहिल्या लोहरीचे फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. चाहते त्यांच्या फोटोंवर भरभरून लाईक्स आणि कमेंट्स देत आहेत. विकी कौशलने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर लोहरीच्या शुभेच्छा देत आपला आणि कतरिनाचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. चाहते कमेंट्स करून शुभेच्छा आहेत. शिवाय त्यांच्या जोडीचं कौतुकही करत आहेत. काही तासांपूर्वी विकीने हा फोटो शेअर केला आहे. काही वेळेतच या फोटोला साडे पाच लाखांच्यावर लाईक्स मिळाले आहेत.
तर दुसरीकडे अभिनेत्री कतरिना कैफने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये चार फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये विकी आणि कतरिना अग्नीसमोर उभी आहेत. त्यांनी एकमेकांना आलिंगन दिलं आहे. या दोघांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहात आहे. यावेळी कतरिना कैफने ट्रॅडिशनल लुक कॅरी केला आहे. अभिनेत्रीने लाल रंगाचा चुरीदार परिधान केला आहे. तर त्याच्यावर काळ्या रंगाचा जॅकेटही घातला आहे. तर दुसरीकडे विकी अगदी साध्या अवतारात अर्थातच नाईट ड्रेसमध्ये दिसून येत आहे.
विकी आणि कतरिनाने थंडीपासून वाचण्यासाठी जॅकेट घातला आहे. त्यामुळे चाहते असा अंदाज लावत आहेत, की या दोघांनी आपली पहिली लोहरी इंदौरमध्ये साजरी केली आहे. कारण सध्या विकी कौशल आपल्या आगामी ‘लुका छुपी २’ च्या शूटिंगनिमित्त इंदौरमध्ये आहे. तो सध्या सारा अली खानसोबत या चित्रपटाचं शूटिंग करत आहे. काही दिवसांपूर्वी त्यांच्या सेटवरील काही फोटो आणि व्हिडीओ समोर आले होते. (हे वाचा: ) विकी कौशलच्या आगामी कामाबद्दल सांगायचं झालं तर त्याच्याकडे अनेक प्रोजेक्टस आहेत.‘गोविंदा मेरा नाम’, ‘द ग्रेट इंडियन फॅमिली’, ‘द इम्मॉर्टल अश्वत्थामा’, ‘तख्त’ आणि ‘मॉनेक शॉ’ अशा अनेक चित्रपटांमध्ये तो झळकणार आहे. तर दुसरीकडे कतरिना कैफ ‘फोन भूत’, ‘मेरी ख्रिसमस’, ‘टायगर ३’ आणि ‘जी ले जरा’ अशा अनेक चित्रपटात दिसणार आहे. सध्या दोघेही प्रचंड व्यग्र आहेत.