'द बिग पिक्चर'चा हा एपिसोड या वीकेंडला दाखवला जाणार आहे. या एपिसोडचा पहिला प्रोमोही समोर आला आहे. प्रोमोने प्रेक्षकांची उत्सुकता आणखीनच वाढवली आहे. या प्रोमोच्या अगदी सुरुवातीला, कतरिना कैफ रोहित शेट्टीला सांगते की तिने एक महिला केंद्रित पोलिस चित्रपट बनवला पाहिजे. यानंतर, ती खाकी टोपी घालून फिरते आणि दाखवते की ती त्या चित्रपटात परिपूर्ण दिसेल. कतरिना कैफचा हा दबंग अवतार सर्वांनाच पसंत पडतो. मात्र त्यांनतर कतरिना सर्वांनाच चकित करते. कारण कतरिना चक्क मराठीत धसकेबाज डायलॉग म्हणते. त्याचवेळी रणवीर सिंगकडे जाऊन कतरिना कैफ सिंघम चित्रपटाचा डायलॉग बोलते, 'मेरे जमीर में दम है इसलिए मेरी जरुरतें कम है'. तेव्हा यावर रणवीर सिंह बाजीराव मस्तानीमधील ‘बाजीराव मैंने बहुत देखे हैं, लेकिन तुझ जैसा मैंने आज तक नहीं देखा.’ हा डायलॉग म्हणते. खरी मजा यानंतर येते. रणवीरच्या या डायलॉगवर कतरिना कैफने अत्यंत धमाकेदार उत्तर देताना मराठीत म्हटलंय, 'भाऊ, जे मला नाय महिती ते सांगा' कतरिनाच्या या डायलॉगला रणवीरकडे उत्तरच नसतं. रोहित शेट्टी आणि रणवीर सह चाहतेही कतरिनाच्या या डायलॉगवर फिदा होतात. (हे वाचा:महेश मांजरेकरांनी कॅन्सरशी लढा देत केली Antimची शूटिंग;सलमानने सांगितलं....) कतरिना कैफ सूर्यवंशीमध्ये दमदार अॅक्शन करताना दिसणार आहे. अक्षय कुमार आणि कतरिना कैफ या जोडीने यापूर्वीही अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत.दोघांनाही एकत्र खूप पसंत केलं जातं. बऱ्याच काळानंतर दोघेही सूर्यवंशीमध्ये पुन्हा एकदा एकत्र स्क्रिन शेअर करताना दिसणार आहेत. त्याचबरोबर 'आयला रे आला' या चित्रपटाचं पहिलं गाणंही रिलीज झालं आहे. लोकांनाही हे गाणं खूप आवडलं आहे.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Entertainment, Katrina kaif, Ranvir singh, Rohit Shetty