मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

महेश मांजरेकरांनी कॅन्सरशी लढा देत केली Antim ची शूटिंग;सलमानने सांगितलं 'ते' सत्य

महेश मांजरेकरांनी कॅन्सरशी लढा देत केली Antim ची शूटिंग;सलमानने सांगितलं 'ते' सत्य

सलमान खान (Salman Khan) आणि आयुष शर्माचा (Ayush Sharma) बहुप्रतिक्षित चित्रपट 'अंतिम: द फायनल ट्रुथ'(Antim: The Finel Truth) चा ट्रेलर काल लाँच झाला आहे.

सलमान खान (Salman Khan) आणि आयुष शर्माचा (Ayush Sharma) बहुप्रतिक्षित चित्रपट 'अंतिम: द फायनल ट्रुथ'(Antim: The Finel Truth) चा ट्रेलर काल लाँच झाला आहे.

सलमान खान (Salman Khan) आणि आयुष शर्माचा (Ayush Sharma) बहुप्रतिक्षित चित्रपट 'अंतिम: द फायनल ट्रुथ'(Antim: The Finel Truth) चा ट्रेलर काल लाँच झाला आहे.

  • Published by:  Aiman Desai

मुंबई,26ऑक्टोबर- सलमान खान (Salman Khan) आणि आयुष शर्माचा (Ayush Sharma) बहुप्रतिक्षित चित्रपट 'अंतिम: द फायनल ट्रुथ'(Antim: The Finel Truth) चा ट्रेलर काल लाँच झाला आहे. महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. महेश मांजरेकर नुकतंच कर्करोगातून बरे झाले आहेत. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानच महेश यांना कॅन्सर झाल्याची माहिती मिळाली होती. पण त्यांनी चित्रपटाचं शूटिंग थांबवलं नाही. कॅन्सरशी लढा देत शूटिंग सुरू ठेवलं होतं. चित्रपटाच्या ट्रेलर लाँच प्रसंगी त्यांनी हा खुलासा केला आहे.त्यांनी म्हटलं, की चित्रपटांबद्दलची आवड मला माझ्या कठीण काळातही काम करण्यास प्रेरित करते.

त्याचवेळी सलमान खानने महेश मांजरेकर यांचं कामावर असलेल्या समर्पणाचा खुलासा केला आहे. सलमान खानने म्हटलं, “महेशने आम्हाला आधी कॅन्सरविषयी सांगितलं नव्हतं. त्यानं शूटिंगचा काही भाग पूर्ण करताच कॅन्सरची शस्त्रक्रिया करून घेतली." कॅन्सरशी लढा देत असताना चित्रपटाच्या शूटिंगबद्दल बोलताना महेश यांनी म्हटलं, “माझं 35 किलो वजन कमी झालं आहे. 'अंतिम'च्या शेवटच्या भागाच्या शूटिंगदरम्यान मला कॅन्सर झाल्याचं निदान झालं. पण आज मी कर्करोगापासून मुक्त आहे."

महेश मांजरेकरयांनी पुढं म्हटलं, “मी भाग्यवान होतो की किमोथेरपीचा माझ्यावर परिणाम झाला नाही. शूटिंगदरम्यान माझी किमोथेरपी सुरू होती. नंतर माझी शस्त्रक्रिया झाली. माझ्या कामाची आवड मला प्रेरित करते. जेव्हा मला कळले की मला कर्करोग आहे. तेव्हा मला धक्का बसला नाही. मला माहित आहे की असे बरेच लोक आहेत ज्यांना कर्करोग आहे आणि ते लढतात आणि जगतात."

(हे वाचा:सलमान खान आणि आयुष शर्माच्या अ‍ॅक्शन थ्रिलर'Antim'ची प्रतीक्षा ... )

चित्रपटगृहाला पर्याय नाही-

महेश मांजरेकर, आयुष शर्मा, सलमान खान आणि महिमा मखवाणा यांनी मुंबईतील मल्टिप्लेक्समध्ये चित्रपटाचा ट्रेलर लाँच केला. यासोबतच चित्रपटगृहांसाठी चांगला काळ पुन्हा येणार असल्याची आशा सलमानने व्यक्त केली. तो म्हणाला, “मोठ्या पडद्याला पर्याय नाही. संगीतासोबत खुर्च्या हलताना तुम्हाला जाणवले का? त्यामुळे लहान फोन हा सिनेमा हॉलचा पर्याय असूच शकत नाही.

'अंतिम: द फायनल ट्रुथ' द्वारे आयुष पहिल्यांदाच खलनायकाची भूमिका साकारणार आहे. तेही एका अशा चित्रपटात ज्यामध्ये सलमान खान नायक आहे. चित्रपटात सलमान खान एका पोलिसाच्या भूमिकेत आहे. तो सरदार आहे. तर आयुषने एक मजबूत खलनायकाची भूमिका केली आहे. ट्रेलर पाहून कळत आहे की यावेळी या दोघांची जोडी थिएटरमध्ये धमाका करणार आहे.

First published:

Tags: Entertainment, Salman khan