जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / ‘मुंबईकरांनो डबल मास्क लावा, अन्यथा’; कतरिना कैफनं शेअर केली BMCची पोस्ट

‘मुंबईकरांनो डबल मास्क लावा, अन्यथा’; कतरिना कैफनं शेअर केली BMCची पोस्ट

‘मुंबईकरांनो डबल मास्क लावा, अन्यथा’; कतरिना कैफनं शेअर केली BMCची पोस्ट

या प्रचाराला बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) हिनं पाठिंबा दिला आहे. तिनं आपल्या चाहत्यांना मास्कशिवाय घराबाहेर न पडण्याची विनंती केली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई 29 एप्रिल**:** कोरोना विषाणूचं (coronavirus) संक्रमण दिवसेंदिवस वाढतंच चाललं आहे. या वाढत्या संक्रमणाला रोखण्यासाठी वैद्यकिय तज्ज्ञ आता डबल मास्क लावण्याचा सल्ला देत आहे. मुंबई महापालिका देखील सोशल मीडिया पोस्टद्वारे डबल मास्कचा प्रचार करत आहे. (bmc double action effect mask) त्यांच्या या प्रचाराला बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) हिनं पाठिंबा दिला आहे. तिनं आपल्या चाहत्यांना मास्कशिवाय घराबाहेर न पडण्याची विनंती केली आहे. ‘नागडे राजकारणी…नागडं सरकार…नागडा देश….’; आस्ताद काळे संतापला कतरिना चित्रपटांसोबतच सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असते. ग्लॅमरस फोटो आणि व्हिडीओंच्या माध्यमातून ती चर्चेत असते. मात्र यावेळी तिनं कोरोनाबाबत जनजागृती करण्यासाठी एक BMC ची पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टद्वारे तिनं मास्क वापरण्याचे फायदे सांगितले आहेत. डबल मास्कच्या मदतीनं तुम्ही कोरोनाला आणखी दूर ठेवू शकता असं ती म्हणाली. शिवाय मुंबईकरांच्या मदतीसाठी तिनं काही हेल्पनंबर देखील शेअर केले आहेत. तिची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

जाहिरात

भारतात रुग्णसंख्येत थोड्या प्रमाणात घट झाल्याने दिलासा मिळालेला असतानाच पुन्हा एकदा चिंता वाढवणारी आकडेवारी समोर आली आहे. देशात गेल्या 24 तासांत आतापर्यंतच्या सर्वाधिक मृत्यूंची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासांत 3293 रुग्णांनी आपला जीव गमावला असून हा आतापर्यंतचा उच्चांक आहे, दैनंदिन रुग्णसंख्याही पुन्हा एकदा वाढली असून गेल्या 24 तासांत 3 लाख 60 हजार 960 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. आरोग्य मंत्रालयाकडून ही आकडेवारी देण्यात आली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात