जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Katrina Kaif ने पुन्हा लपवलं बेबी बंप; नव्या व्हिडीओवरुन चर्चांना उधाण

Katrina Kaif ने पुन्हा लपवलं बेबी बंप; नव्या व्हिडीओवरुन चर्चांना उधाण

Katrina Kaif ने पुन्हा लपवलं बेबी बंप; नव्या व्हिडीओवरुन चर्चांना उधाण

गेल्या काही दिवसांपासून कतरिना कैफ प्रेग्नंट असल्याची चर्चा आहे. प्रेग्नेंसीच्या चर्चेदरम्यान, कतरिनानं सोशल मीडियावर एक नवा व्हिडीओ शेअर केला आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 28 ऑगस्ट: बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ सध्या सोशल मीडियावर कायम चर्चेचा विषय ठरत असते. अभिनेता विकी कौशलसोबत लग्नबंधनात अडकल्यापासून ती अधिक चर्चेत आहे. अशातच गेल्या काही दिवसांपासून कतरिना कैफ प्रेग्नंट असल्याची चर्चा आहे. प्रेग्नेंसीच्या चर्चेदरम्यान, कतरिनानं सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमुळे तिच्या प्रेग्नेंसीच्या चर्चा आणखीनच रंगल्याचं दिसत आहे. कतरिनाने तिच्या इन्स्टाग्राम अकांउंटवर एक छोटासा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये दिसतंय की कतरिना तिच्या घराच्या बाल्कनीत बसून चील करत आहे. या व्हिडीओतील विशेष बाब म्हणजे, अभिनेत्रीने आपला बेबी बंप लपवण्यासाठी एक पाय वर केला आहे जेणेकरून तिचे पोट कॅमेऱ्याच्या नजरेपासून लपून राहिल. कतरिनाने पुन्हा एकदा बेबी बंप लपवल्यानं ती खरंच प्रेग्नंट आहे की काय?, असं नेटकऱ्यांना वाटत आहे.

जाहिरात

विकी आणि कतरिना यांचं लग्न चाहत्यांसाठी कायमच चर्चेचा विषय राहिलं आहे. विकी आणि कतरिना यांचा डिसेंबर महिन्यात अगदी खाजगी पद्धतीने विवाहसोहळा पार पडला. विकी आणि कतरिनाचं हे कपल सध्या सगळ्या चाहत्यांच्या आवडीचं ठरत आहे. सध्या कॅट खरंच आई होणार आहे का याकडे चाहत्यांचे डोळे लागले आहेत. हेही वाचा -  Priyanka Chopra:‘गेंदा फूल’ गाण्यावर प्रियांकाच्या मुलीनं धरला ठेका, क्युट VIDEO होतोय व्हायरल दरम्यान, विकी आणि कतरिना लग्नानंतर या नवीन अपार्टमेंटमध्ये शिफ्ट झाले आहेत.त्याच कॉम्प्लेक्समध्ये त्याचं आलिशान घर आहे जिथे अनुष्का शर्मा आणि विराट कोहली राहतात.गेल्या वर्षी कतरिना आणि विकीने मित्रांसाठी ख्रिसमस पार्टी दिली तेव्हा चाहत्यांना त्यांच्या घराची झलकही पाहायला मिळाली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात