जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / सलमान खानची भाची अलिझेची होणार बॉलिवूडमध्ये एंट्री; जाहीरातीतून झाली प्रसिद्ध

सलमान खानची भाची अलिझेची होणार बॉलिवूडमध्ये एंट्री; जाहीरातीतून झाली प्रसिद्ध

सलमान खानची भाची अलिझेची होणार बॉलिवूडमध्ये एंट्री; जाहीरातीतून झाली प्रसिद्ध

सलमान खानची भाची अलीझे अग्निहोत्री (Alizeh Agnihotri) लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करू शकते. काहीच दिवसांपूर्वी एका अॅड फीचर फिल्मच्या शूटिंगमध्ये ती दिसली होती. या जाहिरातीतील तिचा लुक खूपच व्हायरल झाला होता.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई 16 सप्टेंबर : बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) कुटुंबातील आणखी एक सदस्य आता अभिनय विश्वात येण्याची शक्यता आहे. सलमान खानची भाची अलीझे अग्निहोत्री (Alizeh Agnihotri) लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करू शकते. त्यामुळे अलिझे विषयी अनेक चर्चा रंगल्या आहेत. काहीच दिवसांपूर्वी एका अॅड फीचर फिल्मच्या शूटिंगमध्ये ती दिसली होती. या जाहिरातीतील तिचा लुक खूपच व्हायरल झाला होता. दरम्यान अलिझे ही सलमान खानची बहीण अलवीरा अग्नीहोत्री (Alvira Agnihotri) हिची मुलगी आहे. अलविराचा पती अतुल अग्नहोत्री हा प्रसिद्ध चित्रपट निर्माता आहे. अलिझे सध्या काही जाहीराती आणि मॉडेलिंग असाइनमेंट्समध्ये दिसत आहे. त्यामुळे तिच्या बॉलिवूड पदार्पणाविषयी चर्चा रंगल्या आहेत.

जाहिरात

या जाहिरातीत ती अनेक दागिने परिधान केलेली दिसत आहे. या लुकमध्ये अतिशय सुंदर दिसत आहे.  कॅप्शनमध्ये अलिझेने तिच्या भावना शेअर केल्याआहेत. ती म्हणते, ‘दागिन्यांमधील मुलीचे पहिले प्रेम म्हणजे कानातले. पण मी कधीच माझे कान टोचले नाही. मी दागिन्यांच्या प्रेमात कधीच नव्हते पण वर्षानुवर्षे दागिन्यांप्रती माझी रुची बदलली आहे. आधी काहीही न घालण्यापासून, मी आता अशा टप्प्यावर पोहोचलो आहे जिथे मी कपड्यांपूर्वी दागिने ठरवते.’

अलिझे चित्रपटांत येण्यापूर्वीच खूप लोकप्रिय होताना दिसत आहे. याशिवाय सीमा खानच्या मॉडेलिंग असाइनमेंटमध्येही ती दिसली होती. अलिझेने सरोज खान सारख्या नृत्यदिग्दर्शकांकडून नृत्याचे धडेही घेतले आहेत. सध्या ती बॉलिवूडसाठी स्वत: ला तयार करत असल्याचं दिसून येत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात