मुंबई, 8 जून- बॉलिवूड (Bollywood) अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aryan) आज तरुणांच्या गळ्यातील ताईत बनला आहे. कमी वेळेत प्रचंड यश मिळविलं आहे. त्याचा प्रचंड मोठा चाहतावर्ग निर्माण झाला आहे. 'धमाका' सारखा सुपरहिट चित्रपट दिल्यानंतर तो अनीस बज्मीच्या हॉरर कॉमेडी 'भूल भुलैया 2' (Bhool Bhoolaiya 2) मध्ये झळकत आहे. हा चित्रपटही बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत अवघ्या 9 दिवसांत 100 कोटींहून अधिकचा गल्ला जमवला होता. त्यांनतर आता या चित्रपटाने 150 कोटींहून अधिकची कमाई केली आहे. आपला चित्रपट 100 कोटी क्लबमध्ये एन्ट्री करताच अभिनेत्याने एक खास गोष्ट केली. पाहूया काय आहे नेमकं प्रकरण.
कार्तिक आर्यन सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. तो सतत सोशल मीडियावरुन आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असतो. कार्तिक नेहमीच चाहत्यांच्या प्रश्नांची हटके उत्तरे देत असतो. तो सतत चाहत्यांशी संवाद साधत असतो. दरम्यान अभिनेत्याने नुकतंच इन्स्टाग्रामवर चाहत्यांसाठी 'आस्क मी एनिथिंग' सेशन ठेवलं होतं. यावेळी चाहत्यांनी कार्तिकला विविध प्रश्न विचारत त्याच्याशी संवाद साधला. अभिनेत्यानेसुद्धा आपल्या नेहमीच्या हटके स्टाईलने सर्व प्रश्नांची उत्तरे देत सर्वांचं मन जिंकलं आहे.
यावेळी एका युजर्सने प्रश्न विचारत म्हटलं, '150 कोटींमधून तुला किती प्रॉफिट मिळत आहे'? यावर उत्तर देत कार्तिकने म्हटलं, '150 कोटींतून प्रॉफिट नव्हे तर चाहत्यांचं अफाट प्रेम मिळत आहे. यापुढे सर्व आकडे लहान आहेत'. त्यांनतर एका युजर्सने विचारलं, 'भूल भुलैय्या 2' बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. तुला कसं वाटत आहे?' यावर उत्तर देत अभिनेत्याने म्हटलं 'मला शेहजादा झाल्यासारखं वाटत आहे'. विशेष म्हणजे हा कार्तिकचा आगामी चित्रपट आहे.
त्यांनतर एका युजरने विचारलं, 'तुझा चित्रपट100 कोटी क्लबमध्ये एन्ट्री करताच, तू सर्वात आधी काय केलंस?' याचं उत्तर देत कार्तिकने म्हटलं, 'यावेळी मी 100 कोटी क्लबमध्ये चित्रपट पोहोचताच सर्वात आधी मंदिरात पोहोचलो'. अभिनेत्याच्या या उत्तराने चाहत्यांचं मन जिंकलं आहे. सोशल मीडियावर नेटकरी अभिनेत्याचं कौतुक करत आहेत. शिवाय त्याच्या या तुफान यशासाठी त्याला शुभेच्छा देत आहेत. कार्तिक नेहमीच आपल्या हटके स्टाईलने चाहत्यांचं मन जिंकत असतो. यावेळीसुद्धा त्याने तेच केलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood actor, Bollywood News, Entertainment, Kartik aryan, Movie review