बॉलिवूडची फिटनेस फ्रिक आणि ग्लॅमरस अभिनेत्री शिल्पा शेट्टी आज आपला ४७ वा वाढदिवस साजरा करत आहे. या वयातसुद्धा तिचं सौंदर्य एखाद्या नव्या अभिनेत्रींना टक्कर देतं. अभिनेत्री एक रॉयल लाईफ जगते. तिच्याजवळ अफाट संपत्ती आहे. आज तिच्या वाढदिवसानिमित्त तिच्या नेटवर्थवर एक नजर टाकूया.
लंडनमध्येसुद्धा शिल्पाचं एक घर आहे. त्याची किंमत 7 कोटी इतकी आहे. शिवाय इंग्लंडमधील वेयब्रेज या ठिकाणी 7 बेडरुमचा आलिशान फ्लॅटसुद्धा आहे.
शिल्पाजवळ एक प्रायव्हेट जेटसुद्धा आहे. फारच कमी सेलेब्रेटींकडे असा प्रायव्हेट जेट आहे. त्यापैकी शिल्पासुद्धा एक आहे.
चक्क दुबईतील बुर्ज खलिफा याठिकाणी शिल्पाचा एक फ्लॅट होता. परंतु काही वर्षांपूर्वी तो तिने विकल्याचं म्हटलं जातं. तसेच दुबईतील जुमेराह याठिकाणीसुद्धा तिचा एक लक्झरी फ्लॅट आहे.
शिल्पा शेट्टीला महागड्या कार खूप आवडतात. तिच्याजवळ बीएमडब्ल्यू, रेन्जरोव्हर, मर्सिडिज-बेन्ज अशा अनेक आलिशान कार आहेत.
शिल्पा शेट्टी अभिनेत्रीसोबतच एक बिझनेस वुमेनसुद्धा आहे. ती रेस्टोरंट,स्पा,बार अशा विविध बिझनेसमध्ये पैसा आणि नाव कमावत आहे.
शिवाय अभिनेत्री चित्रपट, जाहिराती, टीव्ही शोमधून कोट्यावधी रुपये कमावत आहे.शिल्पा शेट्टीजवळ एकूण 134 कोटींची संपत्ती आहे.