मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Bikini वर पाहण्यासाठी आसुसला होता चाहता; Sonakshi Sinha ने असं काही दाखवलं तो हडबडलाच

Bikini वर पाहण्यासाठी आसुसला होता चाहता; Sonakshi Sinha ने असं काही दाखवलं तो हडबडलाच

विचित्र मागणी करणाऱ्या चाहत्याला सोनाक्षी सिन्हाने केलं 'खामोश'

विचित्र मागणी करणाऱ्या चाहत्याला सोनाक्षी सिन्हाने केलं 'खामोश'

बिकिनी फोटो मागणाऱ्या चाहत्याची सोनाक्षी सिन्हाने (Sonakshi sinha) बोलतीच बंद केली.

मुंबई, 26 ऑगस्ट : बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने (Sonakshi Sinha) अलीकडेच सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांशी संवाद साधला. 'आस्क मी एनिथिंग' (Ask Me Anything Session) सेशनदरम्यान सोनाक्षीला फॅन्सने (Fans) अनेक प्रश्न विचारले. सोनाक्षीनेही त्यांना दिलखुलास उत्तरं दिली. काही विचित्र प्रश्नांचा सामनाही तिला करावा लागला; मात्र सोनाक्षीने त्या प्रश्नांना अशी काही उत्तरं दिली, की फॅन्सची बोलतीच बंद झाली. बाकीचे फॅन्स विचित्र प्रश्न विचारणाऱ्या फॅन्सवर हसू लागले. 'आज मला सुट्टी आहे. मग, चला आपण गप्पा मारू या,' असं सांगून सोनाक्षीने 'आस्क मी एनिथिंग' सेशनची सुरुवात केली. एका चाहत्याने तिचा बिकिनीतला फोटो (Bikini Photograph) शेअर करण्याची मागणी तिच्याकडे केली. त्यावर सोनाक्षीने क्षणार्धात पेअर बिकिनीचा (Pair Bikini) फोटो शेअर केला आणि सर्वांना आश्चर्यचकित केलं. चाहत्याला तिचे बिकिनीतले फोटो अपेक्षित होते; मात्र तिने नुसत्या बिकिनीचे फोटो शेअर करून निरुत्तर केलं. एका फॅनने विचारलं, की काय खाल्लं तर वजन कमी करता येईल. त्यावर सोनाक्षीने सांगितलं, की 'तुम्ही हवा खा.' एका फॅनने तिच्या पायांचा फोटो मागितला. त्यावर मात्र तिने नकारार्थी उत्तर दिलं. हे वाचा - OMG! डान्स करता करता सर्वांसमोरच बदलले अंगावरील कपडे; अभिनेत्रीचा VIDEO VIRAL सोनाक्षी सिन्हाला सोशल मीडियावर बरंच ट्रोल (Troll) करण्यात आलं होतं. त्यामुळे दुःखी होऊन तिने गेल्या वर्षी ट्विटर (Twitter) सोडलं होतं. तिने आपल्या आत्ताच्या सेशनदरम्यानही त्याबद्दल सांगितलं. ट्विटर आणि निगेटिव्हिटी या गोष्टींपासून आपण अंतर कसं राखलं, हे तिने नमूद केलं. 'मी ट्विटरवरून बाहेर पडले म्हणून काही जण अशा रीतीने उत्सव साजरा करत आहेत, की जसं काही एखादी गोष्ट जिंकून घेतली आहे. मी तुमच्यासाठी खूश आहे. तुम्हाला वाटतंय ना, वाटू दे. कोणाला काही फरक पडत नाही. मी या गोष्टीला सामोरं जाण्यासाठी एक काम केलं. माझ्यासाठी जे अपशब्द वापरत असतील आणि माझा अपमान करत असतील, तर त्या गोष्टी माझ्यापर्यंत पोहोचवणारा स्रोतच मी नाहीसा करून टाकला. त्यामुळे इथे केवळ एकच विनर आहे आणि ती मी आहे,' असं सोनाक्षीने सांगितलं. हे वाचा - कंडोम खरेदी करण्यासाठी दुकानात कोणत्या अवस्थेत जायचा Aparshakti Khurana, स्वतः केला खुलासा सोनाक्षी सिन्हाने अलीकडेच 'भुज : दी प्राइड ऑफ इंडिया' (Bhuj : The Pride of India) या सिनेमात अजय देवगणसोबत काम केलं आहे. त्या सिनेमात नोरा फतेही, संजय दत्त आणि शरद केळकर यांचाही समावेश आहे.
Published by:Priya Lad
First published:

Tags: Actress, Bollywood, Bollywood actress, Entertainment, Sonakshi sinha

पुढील बातम्या