मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /राजकुमार राव की विकी कौशल; करणच्या ‘दोस्ताना 2’मध्ये लागणार कोणाची वर्णी?

राजकुमार राव की विकी कौशल; करणच्या ‘दोस्ताना 2’मध्ये लागणार कोणाची वर्णी?

चित्रपटात विकी कौशल(Vicky Kaushal)किंवा राजकुमार रावला(Rajkumar Rao)घेतलं जाण्याची चर्चा सुरू झाली आहे. लवकरच याबाबत अधिकृत घोषणा करण्यात येईल असं या चित्रपटाच्या निर्मात्यांनी जाहीर केलं आहे.

चित्रपटात विकी कौशल(Vicky Kaushal)किंवा राजकुमार रावला(Rajkumar Rao)घेतलं जाण्याची चर्चा सुरू झाली आहे. लवकरच याबाबत अधिकृत घोषणा करण्यात येईल असं या चित्रपटाच्या निर्मात्यांनी जाहीर केलं आहे.

चित्रपटात विकी कौशल(Vicky Kaushal)किंवा राजकुमार रावला(Rajkumar Rao)घेतलं जाण्याची चर्चा सुरू झाली आहे. लवकरच याबाबत अधिकृत घोषणा करण्यात येईल असं या चित्रपटाच्या निर्मात्यांनी जाहीर केलं आहे.

    मुंबई 17 एप्रिल: करण जोहरच्या ‘दोस्ताना 2’(Dostana 2)या चित्रपटातून कार्तिक आर्यनला(Kartik Aaryan)बाहेरचा रस्ता दाखवण्यात आल्यानं,आता या कोणाला घेतलं जाणार याची उत्सुकता निर्माण झाली होती. आता या प्रश्नाचे उत्तर लवकरच मिळण्याची शक्यता असून, चित्रपटात विकी कौशल(Vicky Kaushal)किंवा राजकुमार रावला(Rajkumar Rao)घेतलं जाण्याची चर्चा सुरू झाली आहे. लवकरच याबाबत अधिकृत घोषणा करण्यात येईल असं या चित्रपटाच्या निर्मात्यांनी जाहीर केलं आहे.

    करण जोहरच्या(Karan Johar)धर्मा प्रॉडक्शनतर्फे(Dharma Productions)‘दोस्ताना 2’या चित्रपटाची निर्मिती करण्यात येत असून,या बहुचर्चित चित्रपटात कार्तिक आर्यन याची निवड करण्यात आली होती;पण त्याला चित्रपटाच्या कथेबाबत काही अडचणी होत्या,तसंच त्याचं वर्तन प्रॉडक्शन हाउसला आवडलं नाही. यामुळं अखेर कार्तिक आर्यनला या चित्रपटातून काढून टाकण्यात आलं आहे.

    अवश्य पाहा - ‘स्थानबद्ध झालो तरी मदत थांबवणार नाही’; सोनू सूदला कोरोनाची लागण

    आता या चित्रपटातील महत्त्वाच्या भूमिकेसाठी करण जोहर नवीन अभिनेत्याचा शोध घेत असून,राष्ट्रीय पुरस्कार विजेते अभिनेते विकी कौशल किंवा राजकुमार राव या दोघांपैकी एकाची या भूमिकेसाठी निवड होण्याची शक्यता आहे.

    टाईम्स ऑफ इंडियानं दिलेल्या वृत्तानुसार,विकी कौशल याची निवड होण्याची शक्यता अधिक असून,त्यानं नकार दिल्यास राजकुमार राव याला प्राधान्य दिलं जाईल. विकी कौशल अलीकडेच कोविड-19मधून बरा झाला असून लवकरच तो त्याच्या कामाला सुरुवात करणार आहे. कोविड-19 होण्यापूर्वी तो‘मिस्टर लेले’या चित्रपटाचे शूटिंग करत होता. त्याबरोबरच त्याच्या आणखी दोन चित्रपटांचे काम सुरू आहे. आता दोस्ताना 2 मध्ये कोण काम करणार हे या चित्रपटाचे निर्माते जाहीर करतील तेव्हाच स्पष्ट होईल.

    कार्तिक आर्यनला या चित्रपटातून काढण्यात आल्यानंतर या चित्रपटाच्या निर्मात्यांनी एक निवदेन जाहीर केलं आहे. व्यावसायिक कारणांमुळे आम्ही याबाबतीत मौन पाळण्याचा निर्णय घेतला असून,कोलीन डीकुन्हा दिग्दर्शन करत असलेल्या या चित्रपटातील नवीन कलाकारांबाबत आम्ही लवकरच घोषणा करू. कृपया अधिकृत घोषणेची प्रतीक्षा करा,असं या निवेदनात म्हटलं आहे.

    या चित्रपटात जान्हवी कपूर(Janhavi Kapoor)नायिकेच्या भूमिकेत असून,छोटा पडदा गाजवणारा लक्ष्य लालवाणी(Lakshya Lalwani)या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पदार्पण करणार आहे. 2019मध्ये या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर 20 दिवसांचं शूटिंगही झालं होतं. त्यात कार्तिक आर्यनसह जान्हवी कपूर,लक्ष्य लालवाणी यांनी भाग घेतला होता.

    First published:
    top videos

      Tags: Karan Johar, Rajkumar rao, Vicky kaushal