मुंबई 17 एप्रिल : देशभरात वेगानं कोरोनाचा प्रसार होत असल्याचं चित्र आहे. त्यातही महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या चिंता वाढवणारी आहे. बॉलिवूडमधील अनेक कलाकारही आतापर्यंत कोरोनाच्या विळख्यात आले आहेत. अशात आता कोरोना काळात गरजूंना मदत करणारा रिअल सुपरहिरो सोनू सूद यालाही कोरोनाची लागण (Sonu Sood Tests Positive For Covid 19) झाली आहे. सोनू सूदने ट्विट करत याबद्दलची माहिती दिली आहे. अभिनेत्यानं आपल्या ट्विटमध्ये लिहिलं, की माझा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे, मी स्वतःला क्वारंटाईन केलं आहे. काळजीचं कोणतंही कारण नाही. यातही अभिनेत्यानं या गोष्टीसाठी आनंद व्यक्त केला आहे, की इतरांच्या मदतीसाठी आता त्याच्याकडे अधिक वेळ असेल. सोनू सूदनं पुढे लिहिलं, की उलट आता माझ्याकडे जास्त वेळ असेल, तुमच्या अडचणी सोडवण्यासाठी. लक्षात ठेवा, काहाही त्रास असेल, तर मी तुमच्यासोबत आहे.
अभिनेत्याच्या या ट्विटला अर्ध्या तासाच 10 हजार लाईक्स मिळाले आहेत. तर दीड हजार जणांनी हे ट्विट रिट्विट केलं आहे. चाहत्यांनी सोनू सूद लवकर बरा व्हावा यासाठी प्रार्थना केली आहे. तसंच काळजी घेण्याचा सल्ला अभिनेत्याला दिला आहे. बॉलिवूड (Bollywood) अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) यानं लॉकडाऊनच्या (Lockdown) काळात हजारो स्थलांतरीत मजुरांना (Migrant Workers) त्यांच्या घरी जाण्यासाठी बसची सुविधा उपलब्ध करून दिली. परदेशात अडकलेल्या विद्यार्थ्यांना (Students) परत आणणं असो, विद्यार्थ्यांना ऑनलाइन क्लासेससाठी (Online Classes) मोबाइल पुरवणं असो किंवा शेतकऱ्यांना (Farmers) ट्रॅक्टर मिळवून देणं असो त्याचं मदतकार्य आजही सुरू आहे. सामाजिक कार्याचा वसा त्यानं कायम ठेवला आहे.

)







