

राजेश्वरी खरात ही मराठी सिनेसृष्टीतील एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. (Rajeshwari Kharat/Instagram)


नागराज मंजुळे यांच्या ‘फँड्री’ या सुपरहिट चित्रपटातून प्रकाशझोतात आलेल्या राजेश्वरीचा आज वाढदिवस आहे. 23 व्या वाढदिवसाच्या निमित्तानं देशभरातील चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. (Rajeshwari Kharat/Instagram)


राजेश्वरीनं देखील चाहत्यांच्या शुभेच्छा स्विकारत त्यांच्यासाठी एक खास पोस्ट लिहिली आहे. (Rajeshwari Kharat/Instagram)


सर्वसामान्य कुटुंबातील मुलगी ते लोकप्रिय सेलिब्रिटी असा प्रवास करणाऱ्या राजेश्वरीनं तिच्या मनातील भावना या पोस्टद्वारे व्यक्त केल्या आहेत. (Rajeshwari Kharat/Instagram)


“Many Many Happy Returns Of The Day Dear Rajeshwari .. वय विचारू नका थोडी लाज वाटते परंतु अनुभवाबद्दल सांगायच झाल तर बर्याच प्रमाणात वाईट ही होता आणि खूप सार्या प्रमाणात चांगला ही होता.” (Rajeshwari Kharat/Instagram)


“कधी नजर वर करून न चालणारी, आपल्या कामाशी काम ठेवणारी, कोणी काही बोललं तर ढसा ढसा रडणारी चष्मा लावून दोन वेण्या बांधुन सायकलवर शाळेला जाणारी खूप साधारण मुलगी होती राजेश्वरी.” (Rajeshwari Kharat/Instagram)


“आयुष्यात एक मोठा बदल लिहलेला होता तो घडून आला आणि ती मराठी चित्रपटसृष्टीमध्ये झळकली. अभिनयाचा काहीच वारसा नसलेल्या त्या मुलीला सुरुवातीला माहिती नव्हते हे नवीन जग काय असतं.” (Rajeshwari Kharat/Instagram)


“कोणी अजूनही सोबत उभे आहेत. वेळ चांगली असो वाईट असो आपण सर्व माझ्यासोबत होता आणि आपण दिलेल्या प्रेमामुळे आज राजेश्वरी येथे पोहोचली आहे.” अशा शब्दात तिनं एक लांबलच पोस्ट शेअर करुन अनुभव सांगितला आहे. (Rajeshwari Kharat/Instagram)


राजेश्वरीची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. (Rajeshwari Kharat/Instagram)