अभिनेता जॅकी श्रॉफची मुलगी आणि टायगर श्रॉफची बहिण कृष्णा श्रॉफ पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. तिनं सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत ज्यामुळे सध्या ती चर्चेचा विषय ठरत आहे.
कृष्णानं नुकतेच तिच्या इन्स्टाग्रामवर ब्लॅक कलरच्या बिकिनीमधील काही फोटो शेअर केले आहेत. जे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
या फोटोंमध्ये कृष्णा स्विमिंग पूलमध्ये एंजॉय करताना दिसत आहे. ब्लॅक कलरच्या या बिकिनीमध्ये कृष्णा खूपच हॉट दिसत आहे.
कृष्णा श्रॉफच्या या फोटोंना 40 हजार पेक्षा जास्त लोकांनी लाइक केलं आहे. याशिवाय या फोटोंवर अनेक कमेंट सुद्धा आल्या आहेत. ज्यात तिला क्यूट, हॉट आणि सिजलिंग म्हटलं जात आहे.
कृष्णा बॉलिवूडच्या कॅमेऱ्यापासून नेहमीच दूर असते. एका मुलाखतीत तिनं सांगितलं होतं की तिला बॉलिवूडमध्ये काम करायचं नाही.
कृष्णा श्रॉफ ऑस्ट्रेलियाचा बास्केटबॉलपटू इबान सोबत रिलेशनशिपमध्ये आहे. काही दिवसांपूर्वीच तिनं त्याच्यासोबतचे फोटो शेअर करत याची माहिती दिली होती.
काही दिवसांपूर्वी बिकिनी घालून इबानसोबत बीचवर फिरतानाचे कृष्णाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. हे फोटो कृष्णानं स्वतः तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले होते.