मुंबई, 4 मे : गीतकार जावेद अख्तर नेहमीच कोणत्याही मुद्द्यावर आपलं मत स्पष्टपणे मांडताना दिसतात. मात्र त्याच्या याच स्वभावामुळे अनेकदा ते वादाच्या भोवऱ्यात सापडतात. नुकतंच जावेद यांनी भोपाळमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात बुरखा आणि घूंघट दोन्हीवर बंदी घालावी असं वक्तव्य केलं होतं. मात्र त्यानंतर नव्या वादाला तोंड फुटलं आहे. जावेद अख्तर यांना या वक्तव्यामुळे आता करणी सेनेच्या रोषाला सामोरं जावं लागत आहे. करणी सेनेचे प्रमुख जीवन सिंह सोलंकी यांनी जोवेद यांच्या विरोधात एक व्हिडिओ शेअर करत त्यांना धमकी दिली आहे.
करणी सेनेचा हा 45 सेकंदांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून यात सोलंकी यांनी म्हटलंय, 'जावेद यांना आपल्या मर्यादा समजायला हव्या. राजस्थानसारख्या राज्याच्या संस्कृतीवर प्रश्न उपस्थित करू नये. जावेद अख्तर यांनी त्यांचा या वक्तव्याबाबत 3 दिवसांच्या आत माफी मागावी अन्यथा आमच्या विरोधाला तयार राहावं. अशा लोकांना करणी सेना चांगलंच ओळखते. भन्साळीसाहेबांना एकदा विचारा की अशा लोकांना करणी सेना कशाप्रकारे उत्तर देते. जर राजस्थानच्या संस्कृतीवर कोणी शंका उपस्थित केली तर करणी सेना त्या व्यक्तीचे डोळे काढून हातात देण्याची हिंमत ठेवते. जर जावेद अख्तर यांनी तीन दिवसांच्या आत माफी मागितली नाही तर करणी सेना त्यांना घरात घुसून मारण्यासही मागेपुढे पाहणार नाही.'
Some people are trying to distort my statement . I have said that may be in Sri Lanka it is done for security reasons but actually it is required for women empowerment . covering the face should be stopped whether naqab or ghoonghat .
भोपाळमधील एका कार्यक्रमात जावेद यांनी श्रीलंकेत झालेल्या आतंकवादी हल्ल्यानंतर बुरख्यावर घालण्यात आलेल्या बंदीबाबत बोलताना, 'बुरखा आणि घूंघट दोन्हींवर बंदी घालावी.' असं वक्तव्य केलं होतं. जावेद म्हणाले, 'श्रीलंकेत बुरख्यावर नाही तर चेहरा झाकण्यावर बंदी घालण्यात आली आहे. जर भारतात अशाप्रकारे बुरख्यावर बंदी घालण्यात आली तर केंद्र सरकारनं राजस्थानात मतदान होण्याआधी घूंघटवरही बंदी घालावी. बुरखा आणि घूंघट दोन्ही राहीले नाही तर मला आनंद वाटेल.' पण त्याच्या या वक्तव्यानं करणी सेना मात्र भडकलेली आहे.