अमिताभ बच्चन यांच्या घरची 'दीवार' तुटणार की टिकणार?

अमिताभ बच्चन यांच्या प्रतीक्षा बंगल्याबाहेरून जाणारा संत ज्ञानेश्वर मार्ग हा अवघ्या 45 फूट रुंदीचा आहे. त्यामुळे नेहमी इथे ट्रॅफिकमध्ये गाड्या अडकतात.

News18 Lokmat | Updated On: May 3, 2019 07:47 PM IST

अमिताभ बच्चन यांच्या घरची 'दीवार' तुटणार की टिकणार?

स्वाती लोखंडे-ढोके, प्रतिनिधी

मुंबई, 03 मे : अमिताभ बच्चन यांच्या बंगल्यातील लाॅनची जागा मुंबई पालिका लवकरच ताब्यात घेणार आहे. कारण, अमिताभ च्या बंगल्याबाहेरचा रस्ता रुंदीकरण करण्यासाठी ही जागा घेण्याशिवाय काही पर्याय नाही.

'मेरे आंगने मे तुम्हारा क्या काम है' अमिताभ बच्चन पालिका अधिकाऱ्यांना असा प्रश्न विचारतील का? तर याच उत्तर आहे होय.

कारण, अमिताभ बच्चन यांच्या बंगल्याच्या समोरची जवळपास 9 फुटांची जागा घेणार आहे आणि अमिताभ बच्चन यांनी आतापर्यंत तरी कोणतीच  हरकत घेतली नाही.

अमिताभ बच्चन यांच्या प्रतीक्षा बंगल्याबाहेरून जाणारा संत ज्ञानेश्वर मार्ग हा अवघ्या 45 फूट रुंदीचा आहे. त्यामुळे नेहमी इथे ट्रॅफिकमध्ये गाड्या अडकतात.

Loading...

इतकाच काय पण रविवारी जेव्हा अमिताभ यांचे फॅन बंगल्याबाहेर वाट बघतात आणि अमिताभ किंवा त्यांची पत्नी जया, कधी कधी ऐश्वर्या, तर कधी अभिषेक बाहेर येऊन अभिवादन करतात, तेव्हा हा रस्ता पूर्णपणे बंद होतो. गेली अनेक वर्षे हे घडतंय.

त्यामुळे 45 फुटांचा हा रस्ता 60 फुटांचा रुंद करण्यासाठी त्या रस्त्यावरच्या सगळ्या प्रॉपर्टी ना 2017 मध्ये नोटीस बजावण्यात आल्या. पालिका त्याबदल्यात टीडीएस ही देणार आहे. पण अमिताभ बच्चन यांचा शेजारी असलेले सत्यमुर्ती यांनी हरकत घेत 2017 मध्ये हायकोर्टात धाव घेतली.

याच आठवड्यात जेव्हा कोर्टाने सत्यमुर्ती यांना दिलासा देण्यास नकार दिला. त्यानंतर आज पालिकेनं सत्यमुर्ती यांची जागा ताब्यात घ्यायला सुरुवात केली. त्यानंतर आता शेवटी अमिताभ बच्चन यांची प्रतीक्षा बंगल्याची जागा पालिका ताब्यात घेणार आहे, ज्याला महिनाभर लागू शकतो.

==============================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 3, 2019 07:47 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...