मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

‘पद्मावतच्या वेळी काय झालं होतं आठवा’; अक्षयच्या ‘पृथ्वीराज’ला करणी सेनेचा इशारा

‘पद्मावतच्या वेळी काय झालं होतं आठवा’; अक्षयच्या ‘पृथ्वीराज’ला करणी सेनेचा इशारा

‘‘पद्मावत’च्या वेळी लक्षात आहे ना काय झालं होत?’; चित्रपटाच्या नावावरून करणी सेना संतापली.

‘‘पद्मावत’च्या वेळी लक्षात आहे ना काय झालं होत?’; चित्रपटाच्या नावावरून करणी सेना संतापली.

‘‘पद्मावत’च्या वेळी लक्षात आहे ना काय झालं होत?’; चित्रपटाच्या नावावरून करणी सेना संतापली.

  • Published by:  News Digital

मुंबई 30 मे : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा (Akshay Kumar) बिग बजेट चित्रपट ‘पृथ्वीराज’ (Pruthviraj) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाची घोषणा झाल्यापासून चित्रपट सतत चर्चेत आहे. 2017 साली मिस वर्ल्ड (Miss World) बनलेली मानुषी छिल्लर (Manushi Chiller) या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. पण करणी सेनेने (Karni Sena)आता या चित्रपटावर करडी नजर ठेवली आहे. तसेच निर्मात्यांना इशाराही दिला आहे.

पृथ्वीराज हा चित्रपट महान राजा पृथ्वीराज चौहान (King Pruthviraj Chauhan) यांच्या जीवनावर आधारीत असणार आहे. त्यामुळे करणी सेना ही सतर्क झाली असून त्यांनी आता चित्रपट निर्मात्यांना चेतावनी दिली आहे. त्यांनी चित्रपटाच्या शिर्षकावरच आक्षेप घेतला आहे. करणी सेनेचे (Karni Sena)  युवा विंगचे अध्यक्ष आणि फिल्ममेकर सुरजीत सिंग राठौड यांनी म्हटलं आहे की, “जर चित्रपट पृथ्वाराज चौहान यांच्या जीवनावर आधारीत असेल तर चित्रपटाचं नाव पृथ्वीराज कसं असेल, चित्रपटाला त्यांच पूर्ण नाव देण्यात याव व त्यांचा मान राखण्यात यावा.”

परेश रावल पडले होते ब्रोशर वाटणाऱ्या तरुणीच्या प्रेमात; पाहा त्यांची अनोखी Love story

याशिवाय करणी सेनेने चित्रपट निर्मात्यांकडे आणखीही काही मागण्या केल्या आहेत.त्यांचं म्हणणं आहे की, “चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी तो त्यांना आधी दाखवण्यात यावा. सुरजीत सिंग राठोडने पुढे म्हलं की जर त्यानीं आमचं म्हणणं ऐकलं नाही तर याचे वाईट परिणाम भोगावे लागतील असा इशारा त्यांना दिला आहे.”

पुढे त्यांनी म्हटलं की “पद्मावतच्या वेळी काय घडलं होत माहीत आहे ना?, जर या निर्मात्यांनी यावर विचार नाही केला तर यांनीही परिणाम भोगायला तयार रहा.” अशी चेतावणीही त्यांनी दिली आहे. त्यामुळे आता चित्रपटाचे निर्माते यावर नक्की काय उत्तर देतात, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

2019 मध्ये अभिनेता अक्षय कुमारने त्याच्या वाढदिवशी या चित्रपटाची घोषणा केली होती. या चित्रपटातून मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर चित्रपटसृष्टीत पदर्पण करत आहे. अक्षय पृथ्वीराज चौहान यांची भूमिका साकारणार आहे तर मानुषी त्यांची पत्नी राणी संयुक्ता ही भूमिका साकारणार आहे.

First published:

Tags: Akshay Kumar, Bollywood, Entertainment