मुंबई 30 मे: परेश रावल (Paresh Rawal) हे भारतीय मनोरंजनसृष्टीतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक म्हणून ओळखले जातात. अगदी बाबुराव पासून तेजा भाई पर्यंत विविध प्रकारच्या भूमिकांद्वारे त्यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. ‘अपना-अपना’, ‘हेरा-फेरी’, ‘आंखें’, ‘चुप चुपके’, ‘हंगामा’, ‘किंग अंकल’, ‘ओह माय गॉड’, ‘संजू’ यांसारख्ये कित्येक चित्रपट त्यांनी आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर गाजवले आहेत. अशा या लोकप्रिय कलाकाराचा आज वाढदिवस आहे. 66 व्या वाढदिवसाच्या निमित्तानं जगभरातील चाहत्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. (Paresh Rawal birthday) चित्रपट असो की राजकारण परेश रावल आज यशाच्या शिखरावर आहेत. पण या अफाट यशाचं श्रेय ते आपल्या पत्नीला देतात. (Paresh Rawal love story) परंतु तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल ते कॉलेजमध्ये ब्रोशर वाटणाऱ्या एका मुलीच्या प्रेमात पडले होते...
परेश रावल त्यावेळी मुंबईतील नर्सी मंजू महाविद्यालयात शिकत होते. शिकत असतानाच त्यांनी एका ड्रामा ग्रुपच्या माध्यमातून अभिनय करण्यासही सुरुवात केली होती. आंतर महाविद्यालयीन स्पर्धांमध्ये भाग घेऊन ते अभिनय क्षेत्रात करिअर करण्याचा प्रयत्न करत होते. त्याच कॉलेजमध्ये अभिनेत्री स्वरूप संपत शिकत होत्या. त्यांना अभिनयात वगैरे फारसा रस नव्हता. पण त्या सौंदर्य स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी प्रयत्न करत होत्या. कॉलेजमधील एका कार्यक्रमादरम्यान दोघांची पहिली भेट झाली. त्या कुठल्याशा कोचिंग क्लासेसचे ब्रोशर वाटत होत्या. पाहताच क्षणी ते स्वरूप यांच्या प्रेमात पडले.
प्रसिद्ध गायिकेच्या घरी लवकरच घुमणार ट्यांह ट्यांहचा सूर; चाहत्यांना दिली GOOD NEWS
त्यांची अवस्था पाहून त्यांच्या मित्रांनी त्यांना चिडवण्यास सुरुवात केली. मित्रांनी त्यांच्यासोबत एक पैज लावली की तू या मुलीला लग्नासाठी मागणी घाल. परेश रावल यांनी लगेचच होकार दिला. अन् ते थेट स्वरूप यांच्या समोर गेले अन् त्यांना लग्नासाठी मागणी घातली. मात्र त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहून ते पार घाबरले अन् तेथून पळून गेले. त्यानंतर जवळपास वर्षभर ते स्वरुप यांच्यासमोर नजर चूकवून चालत असतं. दुसरीकडे परेश रावल यांचा अभिनय प्रवास सुरुच होता. त्यावेळी ते काही व्यवसायिक नाटकांमध्येही काम करत होते. अशाच एका नाटकात काम करताना स्वरुप यांनी त्यांना पाहिलं. त्यांची अभिनय शैली पाहून त्या देखील परेश यांच्या प्रेमात पडल्या. पुढे त्यांची मैत्री झाली. अन् त्यानंतर दोघांनी लग्न केलं. आज ते बॉलिवूडमधील एक आदर्श कपल म्हणून ओळखलं जातं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood actor, Love story