प्रसिद्ध गायिका, अभिनेत्री ब्रिटनी स्पिअर्स हिने आपल्या वडिलांविरोधात आर्थिक फसवणुकीचे आरोप केले आहेत. वडील जेमी स्पिअर्स तिची संपत्ती बळकावण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा तिनं केला आहे. (Britney Spears Fan Page/Instagram)
बुधवारी ब्रिटनीने न्यायालयात या संदर्भात आपली याचिका दाखल केली आहे. ब्रिटनीला तिचे स्वातंत्र्य परत हवं आहे, असं तिनं त्या याचिकेत म्हटलं आहे. (Britney Spears Fan Page/Instagram)
टीएमझेडने दिलेल्या वृत्तानुसार ब्रिटनी गेल्या काही वर्षांपासून नैराश्येमध्ये होती. या काळात जेमी स्पिअर्स तिच्या संपत्तीची देखभाल करत होते. परंतु अभिनेत्री नैराश्येत असल्याचा गैरफायदा घेत त्यांनी कंपनीच्या कामात आर्थिक घोळ घातला, असा आरोप ब्रिटनीने केला आहे. (Britney Spears Fan Page/Instagram)
ब्रिटनी बुधवारी लॉस एंजेलिस कोर्टात व्हिडिओ कॉलद्वारे उपस्थित होती. सुमारे 20 मिनिटे तिने तिची व्यथा सांगितली आणि तिने तिचे स्वातंत्र्य मागितले आहे. (Britney Spears Fan Page/Instagram)
शिवाय, “माझे वडील घोटाळेखोर आहेत. त्यांना तुरुंगात टाका. त्यांनी माझं स्वातंत्र्य हिरावून घेतलं आहे.” अशी विनंती देखील तिनं कोर्टात केली. गेलं वर्षभर हे प्रकरण कोर्टात सुरु आहे. (Britney Spears Fan Page/Instagram)