शिल्पा शेट्टीने नाकारली 10 कोटींची ऑफर; चाहत्यांनी केला कौतुकाचा वर्षाव
या नकारासाठी शिल्पाचं सोशल मीडियावर कौतुक देखील केलं जात आहे.
|
1/ 5
शिल्पा शेट्टी ही बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. शिल्पा आज सिनेसृष्टीत कार्यरत नसली तरी देखील तिच्या लोकप्रियतेत बिलकूल कमतरता आलेली नाही.
2/ 5
अलिकडेच या 46 वर्षीय अभिनेत्रीला एका जाहिरातीसाठी तब्बल 10 कोटी रुपयांची ऑफर मिळाली होती. परंतु शिल्पानं ही जाहिरात करण्यास साफ नकार दिला.
3/ 5
ही एका स्लिमिंग पिल्सची (वजन कमी करण्यासाठी घेतल्या जाणाऱ्या गोळ्या) जाहिरात होती. मात्र अशा कुठल्याही गोळ्यांची जाहिरात न करण्याचा निर्णय शिल्पानं घेतला आहे.
4/ 5
वजन कमी करण्यासाठी घेतल्या जाणाऱ्या गोळ्या कायम डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच घेतल्या जाव्या असा सल्ला वैद्यकिय तज्ज्ञ देतात. कारण अशा प्रकारच्या गोळ्यांचा तुमच्या शरीरावर विपरित परिणाम देखील होऊ शकतो.
5/ 5
शिवाय स्लिमिंग पिल्स घेऊन आत्महत्या केल्याच्या घटना देखील घडल्या आहेत. त्यामुळं शिल्पानं अशा कुठल्याही गोष्टीची जाहिरात करण्यास नकार दिला आहे. या नकारासाठी शिल्पाचं सोशल मीडियावर कौतुक देखील केलं जात आहे.