मुंबई, 18 सप्टेंबर- बॉलिवूड कलाकारांपेक्षा अलीकडे त्यांची मुलेच प्रचंड चर्चेत आहेत. या स्टारकिड्सची मोठी फॅन फॉलोईंग आहे. बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूरची मुले आत्तापासूनच सोशल मीडियावर चर्चेत असतात. करीना कपूर आणि सैफ अली खान यांची दोन मुलं आहेत. तैमूर आणि जहांगीर (जेह) सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतात. पूर्वी तैमूरचे फोटोज्या पद्धतीने व्हायरल व्हायचे. आता त्याच पद्धतीने जेहचे फोटोही इंटरनेटवर व्हायरल होत आहेत. नुकतंच जेहचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये जेह कुतूहलाने पापाराझी आणि कॅमेऱ्याला पाहण्यासाठी धडपड करताना दिसून येत आहे. सैफ आणि करिनाचा मोठा लेक तैमूर कॅमेऱ्याला पाहून पळ काढतो. तो पापाराझींबाबत फारसा उत्साही दिसत नाही. पण सध्या जेह हे सर्व पाहून उत्साहित होत आहे. समोर आलेल्या व्हिडीओमध्ये जेह आपल्या वांद्रे येथील घरात जात होता. परंतु तेथे आधीच पापाराझी फोटोंसाठी उपस्थित होते. अशा स्थितीत जेह त्यांना पाहून उत्साहित झाला आणि त्यांच्याकडे जाऊ लागला. यावर जेहला सांभाळणारी आया त्याचा हात पकडून त्याला आत नेण्याचा प्रयत्न करत होती. मात्र जेह इतका उत्सुक होता की, तो स्वतः चा हात सोडवून पापाराझींकडे जाण्याचा प्रयत्न करत होता. हा सर्व मजेशीर प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. सध्या हा व्हिडीओ प्रचंड वेगाने सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विरल भयानीने आपल्या इन्स्टा अकाउंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये जेहने पांढर्या रंगाचा टी-शर्ट आणि गुलाबी शॉर्ट्स परिधान केले आहेत. एकीकडे तैमूर आता कॅमेरा पाहून पळून जातो. त्याला जास्त फोटो काढायला आवडत नाही. तर दुसरीकडे जेह कॅमेऱ्याला पाहून उत्सुक होताना दिसत आहे. करीना कपूर नेहमीच जेह आणि तैमूरला लाइमलाईटपासून ठेवण्याचा प्रयत्न करते. परंतु कोणत्या ना कोणत्या माध्यमातून जेह आणि तैमूर कॅमेऱ्यात कैद होत असतात.
**(हे वाचा:** अबब! तमन्ना भाटियाने कॅरी केली इतकी महागडी बॅग; किंमत वाचून व्हाल अवाक ) जेहचा हा गोड व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर चाहते लाईक्स आणि मजेशीर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.एकाने कमेंट करत लिहलंय, ‘जेह मीडिया फ्रेंडली आहे आणि त्याला इंटरव्युव्ह द्यायची इच्छा आहे. तर काहींनी जेहला क्युट बेबी म्हटलं आहे. तर अनेकांनी त्याला कॅमेऱ्याबाबत कुतूहल वाटत असल्याचं म्हटलं आहे.