साऊथ अभिनेत्री तमन्ना भाटियाने आपल्या सौंदर्य आणि अभिनयाच्या जोरावर चाहत्यांना अक्षरशः वेड लावलं आहे. 'बाहुबली' चित्रपटाच्या माध्यमातून ही अभिनेत्री जगभरात लोकप्रिय झाली आहे.
सध्या तमन्ना आपल्या आगामी 'बबली बाउन्सर' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. चित्रपटाचं जोरदार प्रमोशन सुरु आहे. यासाठी अभिनेत्री आपल्या टीमसोबत कपिल शर्मा शोमध्येसुद्धा सहभागी झाली होती.
तमन्ना भाटिया नेहमीच आपल्या व्यावसायिक आयुष्यासोबतच आपल्या खाजगी आयुष्यामुळेही चर्चेत असते. तिची स्टाईल आणि लुक्स लक्ष वेधून घेत असतात.