जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / VIDEO: कोरोनामुळे करीनाला लाडक्या तैमूरचा बर्थडे करता येणार नाही साजरा, केली भावनिक पोस्ट

VIDEO: कोरोनामुळे करीनाला लाडक्या तैमूरचा बर्थडे करता येणार नाही साजरा, केली भावनिक पोस्ट

VIDEO: कोरोनामुळे करीनाला लाडक्या तैमूरचा बर्थडे करता येणार नाही साजरा, केली भावनिक पोस्ट

करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan) आणि सैफ अली खान (Saif Ali Khan) यांचा लाडका मुलगा तैमूर अली खान(Taimur Ali Kahan) 5 वर्षांचा झाला आहे. करीनाला तिच्या लाडक्या मुलापासून त्याच्या वाढदिवशी दूर राहावे लागल्याचे प्रथमच घडत आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 20 डिसेंबर- करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan) आणि सैफ अली खान (Saif Ali Khan) यांचा लाडका मुलगा तैमूर अली खान**(Taimur Ali Kahan)** 5 वर्षांचा झाला आहे. करीनाला तिच्या लाडक्या मुलापासून त्याच्या वाढदिवशी दूर राहावे लागल्याचे प्रथमच घडत आहे. कोरोनाची लागण झाल्याने ती वाढदिवसानिमित्त लाडक्या तैमूरला साधी मिठी देखील शकत नाही. अशा परिस्थितीत करीनाने आपल्या मुलाचा एक गोंडस व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करून आपले प्रेम व्यक्त केले आहे. तैमूरच्या क्यूट व्हिडिओ शेअर करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तैमूरला वाढदिवशी आईकडून मिळाली मोठी शिकवण तैमूर अली खानच्या पाचव्या वाढदिवसानिमित्त आई करीना कपूर खानने तिच्या इन्स्टावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. जेव्हा तैमूर चालायला शिकला म्हणजे पहिले पाऊल ठाकले तेव्हाचा हा व्हिडिओ आहे. करिनाने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये तैमूर चालायला शिकत असल्याचे दिसत आहे. प्रत्येक मुलाप्रमाणे तो चालताना पडत आहे. हा क्यूट व्हिडिओ शेअर करत अभिनेत्रीने भावनिक पोस्ट लिहिली, ‘तुझे पहिले पाऊल, पहिल्यांदाच पडणे…हे सगळं मी त्यावेळी अभिमानाने रेकॉर्ड करून ठेवले. हे पडणे आणि उभे राहणे शेवटच जरी नाही हे मला माहित आहे बाळा. पण एक गोष्ट मला नक्की माहिती आहे की, तू नेहमी मोठी पाऊले उचलत माझी मान अभिमानाने उंचावशील. ……कारण तू माझा वाघ आहेस..वाढदिवसाच्या शुभेच्छा माय हार्टबीट….मेरे टिम टिम..तुझ्यासारखे कोणीही नाही.

जाहिरात

मलायका-अर्जुनने तैमूरला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा करीना कपूरच्या या पोस्टवर, मित्र आणि चाहते तैमूरला त्याच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. मलायका अरोराने ‘हॅपी बर्थडे अवर क्यूटी’ असे लिहिले आहे. तर अर्जुन कपूरने करीनाचा हा व्हिडिओ आणि पोस्ट लाईक केली आहे. वाचा- पनामा पेपर्स प्रकरण: चौकशीसाठी ऐश्वर्या राय बच्चन दिल्लीत ED समोर हजर तैमूर अली खान प्रसिद्ध स्टार किड्सपैकी एक आहे. तैमूर पाच वर्षांचा असला तरी तो त्याच्या जन्मापासूनच चर्चेत आहे. करीना कपूरने कोविड-19 लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. तरीही करीनाला काही दिवसांपूर्वी तसंच तिची मैत्रीण अमृता अरोरा, सीमा खान आणि महीप कपूर यांना कोरोनाची लागण झाली आहे. करण जोहरच्या घरी यांनी 8 डिसेंबरला डिनर केले होते. या पार्टीतूनच यांना कोरोनाची लागण झाल्याची चर्चा आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात