Home /News /entertainment /

देसी गर्लचा धक्कादायक खुलासा; त्या व्हिडीओमुळं मिळाल्या बलात्काराच्या धमक्या

देसी गर्लचा धक्कादायक खुलासा; त्या व्हिडीओमुळं मिळाल्या बलात्काराच्या धमक्या

तो व्हिडीओ पाहून प्रेक्षकांनी प्रियांकाविरोधात वर्णभेदी टीप्पण्या केल्या होत्या. हा दुखद अनुभव तिनं एका पुस्तकाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांना सांगितला आहे. तिचं हे पुस्तक लवकरच वाचकांच्या भेटीस येत आहे.

    मुंबई 23 फेब्रुवारी : प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) ही एक अष्टपैलू अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. तिनं आपल्या जबरदस्त अभिनय शैलीच्या जोरावर बॉलिवूड आणि हॉलिवूड या दोन्ही सिनेसृष्टीत स्वत:चं असं एक वेगळं स्थान निर्माण केलं. 2012 साली प्रसिद्ध पॉपस्टार पिटबुलसोबत एका म्यूझिक व्हिडीओद्वारे तिनं पाश्चात्य मनोरंजसृष्टीत पदार्पण केलं. मात्र त्या व्हिडीओनंतर तिच्यावर अनेकांनी जोरदार टीका केली. अनेक अमेरिकन प्रेक्षकांनी तर तिच्याविरोधात वर्णभेदी टीप्पण्या केल्या होत्या. हा दुखद अनुभव तिनं एका पुस्तकाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांना सांगितला आहे. तिचं हे पुस्तक लवकरच वाचकांच्या भेटीस येत आहे. प्रियांकानं आपल्या आयुष्यावर आधारित एक पुस्तक लिहिलं आहे. अनफिनिश्ड (Unfinished) असं तिच्या या पुस्तकाचं नाव आहे. नुकतंच एका ट्विटद्वारे तिनं या आगामी पुस्तकाची घोषणा केली. या पुस्तकात तिने आपले काही कटू अनुभव देखील सांगितले आहेत. ए....मंग्या...निगकी भाइर..; पाहा तुमच्या आवडत्या अभिनेत्रींची हुबेहुब मिमिक्री तिनं इन माय सिटी या व्हिडीओ अल्बममधून हॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. मात्र तिचं हे गाणं अनेकांना आवडलं नाही. अनेकांनी तिच्यावर जोरदार टीका केली. काहींनी तिच्याविरोधात रंगभेदी टीका केल्या तर काहींनी तिचा उल्लेख सावळी दहशतवादी असा केला. काही अमेरिकन ट्रोलर्सनं तर तुझ्या देशात परत जा आणि सामूहिक बलात्कार करून घे अशी संतापजनक वक्तव्य तिच्याविरोधात केली होती. इंडिया डॉट कॉमनं दिलेल्या वृत्तानुसार हा संपूर्ण अनुभव तिनं अनफिनिश्ड या पुस्तकात लिहिला आहे.
    Published by:Mandar Gurav
    First published:

    Tags: Crime, Marathi entertainment, Priyanka chopra, Rock music

    पुढील बातम्या