मुंबई 13 जुलै: अभिनेत्री करीना कपूर खानच (Kareena Kapoor Khan) नवं पुस्तक नुकतच लाँच झालं आहे. करीनाने तिच्या प्रेगनन्सीवर आधारित हे पुस्तक लिहिलं आहे. पण आता हे पुस्तक वादाच कारण ठरत आहे.
'करीना कपूर खानचं प्रेग्नन्सी बायबल' (Kareena Kapoor Khan’s pregnancy Bible) असं या पुस्तकाचं नाव आहे. सोशल मीडियावरून करीनाने या पुस्तकाची माहिती दिली होती. पण आता यावरून वाद निर्माण झाले आहेत.
View this post on Instagram
या पुस्तकाविरोधत ऑल इंडिया मायनॉरिटी बोर्डाने (All India Minority Board) तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. ऑल इंडिया मायनॉरिटी बोर्डचे अध्यक्ष डायमंड युसुफ यांनी कानपूरमध्ये एका बैठकीच आयोजन केलं होतं. ज्यात करीनाच्या पुस्तकाचा विरोध करण्यात आला. पुस्तकाचं नाव प्रेगनन्सी बायबल ठेवल्याने हा विरोध केला जात आहे.
कधीकाळी जॉन अब्राहमचं हेलमेट केलं होतं डिलिव्हर; आज आहे बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता
सूत्रांच्या माहितीनुसार मायनॉरिटी बोर्ड लवकरच करीना विरोधात कायदेशीर कारवाई करण्याची तयारी करत आहे. त्यामुळे करीना विरोधात लवकरच गुन्हा दाखल होऊ शकतो. (Kareena Kapoor Khan book contrpversy)
View this post on Instagram
दरम्यान करीनाने या पुस्तकात तिची गर्भावस्थेत काय मनस्थिती होती. तिला कोणत्या गोष्टींचा सामना करावा लागला. याविषयीचे अनुभव मांडले आहेत. दोन्ही वेळेला करीनाच मोठ्या प्राणावर वजन वाढलं होतं. त्यावरही तिने या पुस्तकात अनुभव मांडला आहे.
बोल्ड आणि ब्युटीफूल! मिथिला पालकरचा मोनोकिनीत दिसला हटके अंदाज
करीना आणि सूद आली खान या वर्षी दुसऱ्यांदा आई बाबा झाले आहेत. नुकतच त्यांनी त्यांच्या दुसऱ्या मुलाचं नाव देखील ठेवलं आहे. मोठ्या मुलाचं नाव तैमूर तर लहान मुलाचं जेह असं नाव ठेवलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood actress, Entertainment, Kareena Kapoor, Kareena kapoor baby