सलमान खानचे 'हे' चित्रपट ठरले होते एकदम फ्लॉप; चाहत्यांनाही बसला होता धक्का
नवभारत टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत हर्षर्धनने त्याच्या आगामी चित्रपटाविषयी देखील सांगीतलं, तर त्याच्या पुढील चित्रपट हा अभिनेता जॉन अब्राहमच्या प्रॉडक्शन अंडर तयार होणार आहे. त्याविषयी तो म्हणाला, “जॉन सरांच्या समोर मी नेहमीच नर्व्हस असतो. दरम्यान 2004 साली मी कुरियर बॉयचं काम करत होतो. आणि त्यावेळी मी जॉन सरांचं हेलमेट डिलिव्हर केलं होतं. त्यावेळी त्यांना पाहून माझ्या ज्या भावना होत्या आजही त्या आहेत.”पुढे हर्षवर्धनने सांगीतलं की, “जॉन सर माझ्या चित्रपटाची निर्मिती करत आहे. पण आजही त्यांनी माझ्या खांद्यावर हात ठेवला की मी नर्व्हस होतो, की वाटतं कधी हात निघेल कधी हात निघेल. मी मागे जाऊ लागतो. आजही त्यांच्यासाठी सरचं शब्द निघतो. ते म्हणतात की सर नको म्हणू, पण माझ्याच्याने नाही होत नाही. कारण जेव्हा त्यांना मी भेटलो होतो, केसांना तेल लावलेलं, चेहऱ्यावर पिंपल्स आणि घाणेरडी बाईक घेऊन मी डिलिव्हरीसाठी गेलो होतो. आणि आज ते माझ्या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. त्यांच्यासमोर मी आजही नर्व्हस होतो. मी प्रयत्न करतो की मी थोडा खुलेल. पण ते होत नाही, मला नाही वाटत या जन्मात होईल.”View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Entertainment, John abraham, Taapsee Pannu