मुंबई 2 ऑगस्ट**:** बॉलिवूडची बेबो करीना कपूर सध्या सिनेसृष्टीपासून दूर आहे. मात्र खासगी आयुष्यामुळे ती नेहमीच चर्चेत असते. सध्या तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ तिने सिस्टर्स डेच्या निमित्ताने इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. यामध्ये ती करिश्मा कपूरसोबत मजा करताना दिसत आहे. दोन्ही बहिणी डाएट फूड विसरून फास्ट फूडचा आनंद घेताना दिसत आहेत. “लोलो आणि मला एक सुंदर विकेंड हवा होता. अन् अखेर तो आम्हाला मिळाला.” अशा आशयाची कॉमेंट करत करीनाने हा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यांचा हा फूड व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. राज कुंद्राला का झाली अटक? सरकारी वकीलांनी मुंबई उच्च न्यायालयात सांगितलं कारण
राज कुंद्रा पॉर्न केसबाबत शिल्पा शेट्टीची मोठी प्रतिक्रिया यापूर्वी करीना आपल्या फिटनेस मंत्रामुळे चर्चेत होती. करीनानं प्रसिद्ध आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर यांच्या सल्ल्याप्रमाणे आपला आहार आणि व्यायाम करून झिरो फिगर मिळवली होती. आजही ती त्याच पद्धतीचा वापर करून आपला फिटनेस राखत आहे. स्लिम-ट्रिम राहण्यासाठी अभिनेत्री खूपच कठीण डाएट करतात. तेलकट पदार्थ, गोड खात नाहीत. तूप तर वर्ज्यच असते. अशावेळी झिरो फिगर राखणारी करीना मात्र प्रत्येक जेवणात तूप खाते म्हटल्यावर सगळ्यांना आश्चर्य वाटतं; पण तूपामुळे शरीर तंदुरुस्त राहतंच पण त्वचाही चमकदार राहते. करीना देखील याला दुजोरा देते. आपल्या चमकदार त्वचेचं (Glowing Skin) रहस्य तूप खाण्यात असल्याचं ती सांगते.

)







