• Home
  • »
  • News
  • »
  • entertainment
  • »
  • राज कुंद्राला का झाली अटक? सरकारी वकीलांनी मुंबई उच्च न्यायालयात सांगितलं कारण

राज कुंद्राला का झाली अटक? सरकारी वकीलांनी मुंबई उच्च न्यायालयात सांगितलं कारण

कुंद्रा आणि थोर्पे यांनी पोलिसांना तपासात सहाय्य करण्याऐवजी व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप्स, चॅट्स डिलीट करायला सुरुवात केली. पुरावे नष्ट करण्यासाठी ते धडपडत होते. आरोपी जेव्हा पुरावे नष्ट करायला सुरुवात करतात, तेव्हा तपास यंत्रणा मूक साक्षीदार बनून राहू शकत नाही.

  • Share this:
मुंबई, 2 ऑगस्ट : राज कुंद्रा यांच्याशी संबंधित दोन अ‍ॅप्समधून मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने 51 पोर्नोग्राफिक फिल्म जप्त केल्या आहेत. राज कुंद्रा (Raj Kundra) आणि त्यांचा सहाय्यक रायन थोर्पे (Ryan Thorpe) यांनी व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप आणि चॅट्स डिलीट करायला सुरुवात केली होती. अशा प्रकारे पुरावे नष्ट करायला त्यांनी सुरुवात केल्यामुळे पोलिसांना त्यांना अटक करावी लागली, अशी माहिती सरकारी वकील अरुणा पै (Adv. Aruna Pai) यांनी शनिवारी (31 जुलै) मुंबई हायकोर्टात दिली. कुंद्रा आणि थोर्पे यांनी पोलिसांना तपासात सहाय्य करण्याऐवजी व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप्स, चॅट्स डिलीट करायला सुरुवात केली. पुरावे नष्ट करण्यासाठी ते धडपडत होते. आरोपी जेव्हा पुरावे नष्ट करायला सुरुवात करतात, तेव्हा तपास यंत्रणा मूक साक्षीदार बनून राहू शकत नाही. आरोपींना तसं करण्यापासून प्रतिबंध करणं अत्यावश्यक असतं. म्हणूनच आरोपींच्या कृतींना प्रतिबंध करण्यासाठी त्यांना पोलिसांनी अटक केली, असं स्पष्टीकरण अरुणा पै यांनी मुंबई हायकोर्टात (Bombay High court) दिलं. 'हॉटशॉट (Hotshot) आणि बॉली फेम (Bollyfame) या अ‍ॅप्समधून पोलिसांनी 51 पोर्नोग्राफिक फिल्म्स (Pornographic Films) जप्त केल्या आहेत. त्याशिवाय कुंद्रा यांचा पर्सनल लॅपटॉप, मोबाईल फोन आणि स्टोरेज एरिया नेटवर्क डिव्हाइसमधूनही आणखी काही फाइल्स जप्त करण्यात आल्या आहे,' अशी माहितीही अरुणा पै यांनी दिली. पोलिस आपलं म्हणणं सादर करतील, अशी माहिती पै यांनी दिल्यानंतर न्या. ए. एस. गडकरी यांच्या पीठाने हा खटला पुढील सुनावणीपर्यंत स्थगित केला. कुंद्रा यांना अटक केल्यानंतर त्यांनी आपले वकील अबद पोंडा यांच्या माध्यमातून कोर्टात धाव घेतली. त्यांच्या वकिलांनी अटकेबाबत मुख्य महानगर दंडाधिकाऱ्यांनी दिलेले आदेश रद्द करण्याची मागणी केली होती. संबंधित फिल्म्समध्ये पॉर्न कंटेंट (Porn Content) म्हणजेच लैंगिक क्रियांचं चित्रण नसून, तो व्हल्गर (बीभत्स) कंटेंट (Vulgar Content) आहे, असं स्पष्टीकरण कुंद्रा यांच्या वकिलांकडून देण्यात आलं होतं.

राज कुंद्रा पॉर्न केसबाबत शिल्पा शेट्टीची मोठी प्रतिक्रिया

19 जुलै रोजी कुंद्रा यांच्या घरावर छापे घातल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती. 27 जुलैला त्यांना कोर्टात हजर करण्यात आलं. त्यानंतर त्यांना 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलं. या प्रकरणात आतापर्यंत पोलिसांनी 11 जणांना अटक केली आहे. या प्रकरणी कुंद्रा यांची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचीही पोलिसांनी चौकशी केली आहे. मात्र तिचा या प्रकरणात काही सहभाग असल्याचं पोलिसांना आतापर्यंतच्या तपासात आढळलेलं नाही. पोलिसांनी तिला क्लीन चिटही दिलेली नाही. यश ठाकूर ऊर्फ अरविंद श्रीवास्तव या राज कुंद्रा यांच्या सहकाऱ्याच्या या प्रकरणातल्या सहभागाबद्दलही तपास केला जात आहे. त्यांनी मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशात अडल्ट कंटेंट पसरवण्यात महत्त्वाची भूमिका निभावली असल्याचा आरोप त्याच्यावर आहे. मात्र त्याने या आरोपांचं खंडन केलं आहे. आपल्याला यात विनाकारण गोवलं जात असल्याचं त्याने म्हटलं आहे. राज कुंद्रा यांच्या बहिणीचे पती प्रदीप बक्षी यांनी हॉटशॉट हे अ‍ॅप विकसित केलं असून, ते लंडनमधल्या केनरिन कंपनीचे मालक आहेत. ब्रिटिश नागरिक असलेल्या बक्षी यांच्याशी कुंद्रा यांनी हॉटशॉट अ‍ॅपबद्दल एक ई-मेलही शेअर केला होता, अशी माहिती अ‍ॅड. पै यांनी कोर्टात दिली आहे.
First published: