• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • राज कुंद्रा पॉर्न केसबाबत शिल्पा शेट्टीची मोठी प्रतिक्रिया

राज कुंद्रा पॉर्न केसबाबत शिल्पा शेट्टीची मोठी प्रतिक्रिया

शिल्पाने ट्विटरवर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 2 ऑगस्ट : प्रसिद्ध उद्योजक आणि बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) हिचे पती राज कुंद्रा यांना (Mumbai police arrested Raj Kundra) मुंबई पोलिसांनी 19 जुलै रोजी अटक केली. फेब्रुवारी महिन्यात मुंबई पोलिसांकडे अश्लिल चित्रफीत रेकॉर्ड करणं आणि त्या प्रसिद्ध केल्या प्रकरणी तक्रार दाखल झाली होती. त्यानंतर पोलिसांनी राज कुंद्रा यांना अटक केली. याप्रकरणी शिल्पा शेट्टीचीही चौकशी करण्यात आली. आता शिल्पाने याबाबत ट्विटरवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. सध्याची परिस्थिती आव्हानात्मक असून अनेक अफवा, आरोप करण्यात येत आहेत. अनेकांकडून याप्रकरणी अनेक प्रश्न विचारले जात असून ट्रोल केलं जात आहे. हे ट्रोलिंग केवळ माझ्यापुरतंच नाही, तर माझ्या कुटुंबियांनाही यात ट्रोल केलं जात आहे. मी अजूनही याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. हे प्रकरण सध्या न्यायालयीन असल्याने मी माझी प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे माझ्या नावाने, माझ्या कोणत्याही खोट्या अफवा, प्रतिक्रिया देऊ नका. सध्या चौकशी सुरू असून माझा मुंबई पोलीस आणि भारतीय न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. सत्यमेव जयते म्हणत तिने ट्विटरवर पोस्ट केली आहे. आम्ही कायदेशीररित्या सर्व गोष्टी करत आहोत. परंतु तोपर्यंत माझी सर्वांना नम्र विनंती आहे, एक आई म्हणून माझ्या मुलांसाठी आमची प्रायव्हसी जपण्याचा आदर करा. तसंच कन्फर्म नसलेल्या, कोणतीही सत्यता पडताळणी झाल्याशिवाय कोणत्याही गोष्टींबाबत अफवा पसरवू नका, या काळात माझ्या कुटुंबाचा आणि माझ्या प्रायव्हसी अधिकाराचा आदर करा, अशीही विनंती तिने केली आहे.

  शिल्पा शेट्टीच नाही तर 'या' अभिनेत्रीही पतीमुळे झाल्या होत्या Troll

  दरम्यान, राज कुंद्राच्या विआन या कंपनीत शिल्पा शेट्टी 2020 सालापर्यंत संचालकपदी कार्यरत होती. सॉफ्ट पॉर्न प्रकरणाशी संबंधित काही आर्थिक व्यवहार शिल्पा शेट्टीच्या बँक खात्यातून झाले का, राज कुंद्राच्या ऑनलाईन बेटिंगमध्ये शिल्पा शेट्टीचा सहभाग होता का, या दिशेनेही पोलिसांचा तपास सुरू आहे.
  Published by:Karishma
  First published: