मुंबई, 21 जून- बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री करिना कपूर (Kareena Kapoor) आपल्या दुसऱ्या मुलाच्या जन्मानंतर आता पुन्हा एकदा अभिनय क्षेत्रात सक्रिय झाली आहे. करीना कपूर खानने नुकतंच सुजॉय घोषच्या ‘‘डिव्होशन ऑफ सस्पेक्ट एक्स’‘चं शूटिंग सुरू केलं होतं. या चित्रपटात करिना जयदीप अहलावत आणि विजय वर्मासोबत स्क्रीन शेअर करणार आहे. त्यांनतर आता तिने चित्रपटाचं शूटिंग पूर्ण केलं आहे. चित्रपटाचं शूटिंग पूर्ण केल्यानंतर, करिना आता आपल्या कामाचा थकवा दूर करण्यासाठी लंडनला गेली आहे. आणि जवळपास दोन वर्षांनी ती तिच्या आवडत्या कॉफीचा आनंद घेत आहे. अभिनेत्री करिना कपूर सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती सतत आपल्या अपडेट्स चाहत्यांसोबत शेअर करत असते. नुकतंच करिनाने तिच्या इन्स्टाग्रामवर लंडनमधील तिच्या आवडत्या कॉफीचा आस्वाद घेताना एक फोटो पोस्ट केला आहे.या फोटोमध्ये, करीना कपूर खान पांढऱ्या टी शर्ट आणि डेनिम्समध्ये स्लीव्हलेस जॅकेटमध्ये दिसत आहे. यामध्ये ती कॉफीचा मनसोक्त अंदाज घेताना दिसत आहे. हा फोटो शेअर करत तिने लिहलंय, “तुझ्यासाठी तब्बल 2 वर्षे प्रतीक्षा केलीय.. #सिपिंग कोफी, #कॉफी लव्हर’’.
करीना कपूरच्या या पोस्टवर इंडस्ट्रीशी संबंधित मित्र आणि सहकाऱ्यांनी तसेच चाहत्यांनी कमेंट्स केल्या आहेत. तिच्या ‘डिव्होशन ऑफ सस्पेक्ट एक्स’मधील सह-कलाकार, जयदीप अहलावत यांनी करत लिहलंय, “याहहह… सुट्टीचा काळ… खूप मेहनतीनंतर. आनंद घ्या.” रिया कपूरने लिहलंय, “ती आलीय.” तान्या घावरीने हार्ट इमोजी शेअर केला आहे. करिनाचे चाहतेही हार्ट इमोजी शेअर करत आपलं प्रेम व्यक्त करत आहेत. **(हे वाचा:** पुन्हा पडद्यावर दिसणार मास्टरमाइंड विजय साळगावकर; ‘दृश्यम 2’ यादिवशी होणार रिलीज ) करिना कपूर खानने अलीकडेच ‘डिव्होशन ऑफ सस्पेक्ट एक्स’च्या सेटवरील अनेक फोटो शेअर केले आहेत. तिने काही BTS फोटो देखील पोस्ट केले होते ज्यात सैफ अली खान आणि तैमूर देखील दिसून आले होते. एका फोटोमध्ये तैमूर सुजॉयसोबत ब्रूस लीच्या ‘द गेम ऑफ डेथ’च्या पोस्टरसोबत पोज देताना दिसला होता.

)







