मुंबई,21 जून- हिंदी चित्रपटसृष्टीत
(Bollywood) असे काही चित्रपट आहेत, ज्यांनी आपल्या कथेने सर्वांनाच थक्क केलं आहे. त्यातीलच एक चित्रपट म्हणजे 'दृश्यम'
(Drishyam) होय. या थ्रिलर चित्रपटाने सर्वांनाच अक्षरशः खिळवून ठेवलं होतं. अजय देवगण, श्रिया सरण, तब्बू, इशिता दत्ता स्टारर हा चित्रपट पडद्यावर सुपरहिट ठरला होता. या यशांनंतर निर्मते आता चित्रपटाचा सिक्वेल
(Drishyam 2) घेऊन भेटीला येत आहेत. नुकतंच या चित्रपटाची रिलीज डेट समोर आली आहे.
अजय देवगणचा हा थ्रिलर चित्रपट 31जुलै 2015 मध्ये रिलीज झाला होता. यामध्ये अजयने विजय साळगावकर
(Vijay Salgaonkar) या सर्वसामान्य गृहस्थाची भूमिका साकारली होती. जो आपल्या कुटुंबाला वाचवण्यासाठी कोणत्याही टोकाला जाऊ शकतो. शिवाय फारसं शिक्षण न घेतासुद्धा विजयची बुद्धी फारच शार्प दाखवण्यात आली आहे. या चित्रपटात साऊथ अभिनेत्री श्रिया सरणने अजयच्या पत्नीची भूमिका साकारली आहे. तसेच इशा दत्ताने त्याच्या मोठ्या मुलीची भूमिका साकारली होती. सोबतच लोकप्रिय अभिनेत्री तब्बूने यामध्ये आयपीएस अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. जी आपल्याच मुलाच्या मिसिंग केसमध्ये प्रत्येक मार्गाने प्रयत्न करताना दिसून येते.

हा चित्रपट त्यावेळी प्रचंड गाजला होता. चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली होती. शेवट्पर्यंत या चित्रपटाचा थ्रिल टिकून राहतो. आता या चित्रपटाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. येत्या 18 नोव्हेंबरला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. पुन्हा एकदा हाच थ्रिल अनुभवण्यासाठी प्रेक्षक प्रचंड उत्सुक आहेत. यामध्ये आता अभिनेता अक्षय खन्नासुद्धा दिसणार आहे.
(हे वाचा:Nayanthara: साऊथ सुंदरी नयनताराने हनीमूनसाठी निवडलं 'हे' ठिकाण; फोटोंची सोशल मीडियावर चर्चा )
अभिषेक पाठक दिग्दर्शित, या चित्रपटात अजय देवगण, अक्षय खन्ना, तब्बू, श्रिया सरन, रजत कपूर आणि इशिता दत्ता अशी तगडी स्टारकास्ट असणार आहे.या चित्रपटाचं शूटिंग हैदराबादमध्ये पूर्ण केलं जाणार आहे.प्रेक्षक पुन्हा एकदा तीच उत्कंठा नव्याने अनुभवण्यासाठी उत्सुक आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.