जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / काजोलने पती अजय देवगणबद्दल सांगितले दोन सिक्रेट!वाचून तुम्हालाही वाटेल आश्चर्य

काजोलने पती अजय देवगणबद्दल सांगितले दोन सिक्रेट!वाचून तुम्हालाही वाटेल आश्चर्य

काजोलने पती अजय देवगणबद्दल सांगितले दोन सिक्रेट!वाचून तुम्हालाही वाटेल आश्चर्य

बॉलिवूड (Bollywood) अभिनेता अजय देवगण (Ajay Devgn) आज त्याच्या चाहत्यांना ‘इनटो द वाइल्ड विथ बिअर ग्रिल्स’ मध्ये दिसणार आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई,21ऑक्टोबर- बॉलिवूड (Bollywood) अभिनेता अजय देवगण (Ajay Devgn) लवकरच त्याच्या चाहत्यांना ‘इनटो द वाइल्ड विथ बिअर ग्रिल्स’ मध्ये दिसणार आहे. यामध्ये तो बिअरसोबत (Bear Grylls) एखाद्या कठीण परिस्थितीमध्ये जगण्य्साठी कशी धडपड करायची याचं तंत्र शिकवताना दिसणार आहे. काही दिवसांपूर्वीच शोचा प्रोमो रिलीज झाला होता. शोच्या प्रोमोमध्ये आपण अजय देवगणचे हे रूप आधीच पाहिलं आहे जे यापूर्वी पाहिलं नव्हतं. त्याचबरोबर, त्याची पत्नी आणि अभिनेत्री काजोल या शोमध्ये अजय देवगणला पाहून खूप उत्साहित आहे. काजोल (Kajol) शोमध्ये अजय देवगणबद्दल बोलताना दिसणार आहे.

जाहिरात

काजोलने अजय देवगणला शोमध्ये बॉर्डरलाइन ओसीडी असल्याचं उघड केलं आहे. काजोल म्हणाली, ‘अजय देवगणशी संबंधित काही रहस्ये आहेत ज्यांच्याबद्दल अनेकांना माहिती नाही. त्यापैकी एक म्हणजे तो एकउत्तम स्वयंपाकी आहे. दुसरं म्हणजे अजयकडे बॉर्डरलाइन ओसीडी आहे. त्याला बोटांनी कोणत्याही गोष्टीला स्पर्श करण्यात अडचण येते. अजयच्या मते, त्याला वाटते की त्याच्या बोटांना कोणताच वास येत नाही. म्हणूनच मी त्याला आव्हान देऊ इच्छिते की त्याला प्रत्येकचांगल्या किंवा दुर्गन्धी अशा प्रत्येक गोष्टीला हातानेच स्पर्श करावा लागेल, मग मी पाहते तो या परीक्षेत खरा उतरतो कि नाही’. रोहित शेट्टीने दिला खास संदेश- त्याचबरोबर अजय देवगणचा सर्वात चांगला मित्र रोहित शेट्टीनेही त्याला एक संदेश दिला आहे.त्यानी म्हटलं, ‘हे बरोबर नाही, साहेब, तुम्ही मला सोडलं आणि बिअरबरोबर गेलात … हुह्हह! आता लोकांनी तुम्हाला इतक्या वर्षांपासून इतके स्टंट करताना पाहिलंआहे. आणि तेही तेव्हापासून जेव्हा कोणतेही स्पेशल इफेक्ट्स नव्हते. मला एक आव्हान द्यायचं आहे, असं काहीतरी बनवाज्यावरून तू आणि बिअर या बेटाच्या बाहेर पडू शकाल. पण हो, चित्रपटांप्रमाणे हा देखील ब्लॉकबस्टर स्टंट असावा. ऑल द बेस्ट’. अजय देवगणला शुभेच्छा देत, अनिल कपूर यांनी त्याची प्रशंसा केली आहे. आणि म्हटलं आहे, की तो नेहमीच त्याचं 100% योगदान देतो. हा भाग 22 ऑक्टोबर रोजी म्हणजेच आज प्रसारित केला जाणार आहे.अजय देवगणच्या आधी, रजनीकांत आणि अक्षय कुमार देखील या शोमध्ये दिसले आहेत. (**हे वाचा:** ‘Anek ‘ची रिलीज डेट जाहीर; समोर आला आयुष्मान खुरानाचा ‘FIRST LOOK’ ) कधी आणि कुठे झालं शूटिंग- हा भाग सप्टेंबरमध्ये मालदीवमध्ये शूट करण्यात आला होता. अजय देवगण त्याचा मुलगा युगला त्याच्या टीमसह त्याच्या शूटिंगसाठी घेऊन गेला होता. डिस्कव्हरी प्लस एक्सक्लुझिव्हमध्ये, बिअर ग्रिल्स अजय देवगणसोबत त्याचे कुटुंब, करिअर, आयुष्य आणि शोमधून शिकलेल्या धड्यांवर बोलताना दिसणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात