मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

90च्या दशकात 'ओये ओये गर्ल' सोनमने बोल्ड सीन देत माजवली होती खळबळ! सध्या जगतेय असं आयुष्य

90च्या दशकात 'ओये ओये गर्ल' सोनमने बोल्ड सीन देत माजवली होती खळबळ! सध्या जगतेय असं आयुष्य

सोनमने १९८८मध्ये 'विजय' या चित्रपटातुन बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यावेळी ती केवळ १६ वर्षांची होती.

सोनमने १९८८मध्ये 'विजय' या चित्रपटातुन बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यावेळी ती केवळ १६ वर्षांची होती.

सोनमने १९८८मध्ये 'विजय' या चित्रपटातुन बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यावेळी ती केवळ १६ वर्षांची होती.

    मुंबई, 21ऑक्टोबर- बॉलिवूडमध्ये (Bollywood) काही अभिनेत्री अशा आहेत, ज्या अनेक वर्षांपासून पडद्यावरून गायब झाल्या असल्या तरी आजही लोकांच्या आठवणीत आहेत. अशीच एक अभिनेत्री म्हणजे बख्तावर खान(Bkhtawar Khan) अर्थातच 'ओये ओये गर्ल' सोनम (Sonam) होय. या अभिनेत्रीने ९०च्या (90s)दशकात बोल्ड सीन देत खळबळ माजवली होती. मात्र गेली ३० वर्षे ती चित्रपटसृष्टीपासून गायब आहे. ही अभिनेत्री सध्या बॉलिवूडपासून दूर आपलं आयुष्य जगत आहे. ती सध्या काय करते? कशी दिसते जाणून घेण्याची तिच्या चाहत्यांना उत्सुकता आहे. आज आपण तिच्याबद्दलच जाणून घेणार आहोत. बॉलिवूडमध्ये सध्या बोल्ड सीन देणं अगदी सर्वसामान्य झालं आहे. मात्र ९० च्या दशकात अभिनेत्रींना बोल्ड सीन देणं फारच कठीण होतं. या अभिनेत्री सहजासहजी असे सीन देत नसत. मात्र या काळात काही अभिनेत्री अशा होत्या ज्यांनी बिनधास्त बोल्ड सीन देत सर्वांनाच आश्चर्यचकित केलं होतं. त्यातीलच एक अभिनेत्री म्हणजे सोनम होय. या अभिनेत्रीने 'मिट्टी और सोना' या चित्रपटात बोल्ड सीन देत सर्वांचंच लक्ष वेधलं होतं. एक दोन नव्हे तर अनेक बोल्ड सीन देत अभिनेत्रीने खळबळ माजवली होती. इतकंच नव्हे तर या चित्रपटात अभिनेत्रीने काही न्यूड सीनही दिले होते. त्यामुळे त्या काळात ती प्रचंड चर्चेत आली होती. या चित्रपटाची इतकी चर्चा झाली होती, की चित्रपट पाहण्यासाठी लोकांनाही चित्रपटगृहाबाहेर मोठ-मोठ्या रांगा लावल्या होत्या. सोनमने १९८८मध्ये 'विजय' या चित्रपटातुन बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यावेळी ती केवळ १६ वर्षांची होती.ती आपल्यापेक्षा वयाने दुप्पट असणाऱ्या अभिनेता ऋषी कपूरसोबत दिसली होती. या चित्रपटात राजेश खन्ना, हेमा मालिनी, अनिल कपूर अशी तगडी स्टारकास्ट होती. त्यांनतर अभिनेत्रीला 'त्रिदेव' या चित्रपटाने एक नवी ओळख दिली होती. या चित्रपटातील 'ओये ओये' या गाण्याने तिला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली होती. आजही तिला बॉलिवूडची 'ओये ओये गर्ल' म्हणून ओळखलं जात. सोनम सध्या बॉलिवूड आणि भारतातून दूर परदेशात आपलं आयुष्य जगत आहे. (हे वाचा:बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी जान्हवी कपूरने केला होता हा कोर्स; आर्यन खाननेही....) सोनमने वयाच्या १८व्या वर्षी पहिलं लग्न केलं होतं. त्रिदेवच्या सेटवर भेटलेल्या राजीव रॉयसोबत तिने लग्न केलं होतं. त्यांनतर या अपत्याला २ वर्षातच एक मुलगा झाला होता. त्याच नाव गौरव असं आहे. लग्नाची काही वर्षे ठीक गेल्यानंतर या दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आपल्या मुलासाठी त्यांनी आपलं नातं तसंच सांभाळल. मात्र मुलाने १८ वर्षे पूर्ण केल्यांनतर त्याच्यामध्ये या सर्व गोष्टींची समज आल्यांनतर या दोघांनी आपल्या नात्याचं सत्य त्याला समजावलं. आणि गौरवनेही त्यांना समजावून घेत त्यांचं आयुष्य स्वतंत्र जगण्याची परवानगी त्यांना दिली. वयाच्या ४४ वर्षी या अभिनेत्रीने आपलं दुसरं लग्न केलं आहे. आज सोनम आणि राजीव आपल्या आयुष्यात फार पुढे निघून गेले आहेत. हे दोघेही सुखाने आपलं नवं वैवाहिक आयुष्य जगत आहेत.
    Published by:Aiman Desai
    First published:

    Tags: Bollywood actress, Entertainment

    पुढील बातम्या