मुंबई, 11 मार्च : अभिनेत्री करिना कपूर मागच्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर खूपच चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच करिनानं इन्स्टाग्राम डेब्यू केला. आतापर्यंत करिना 17 लाखांपेक्षा जास्त लोकांनी इन्स्टाग्रामवर फॉलो केलं आहे. पण आता करिनाचा असा एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामुळे तिला सोशल मीडियवर जोरदार ट्रोल केलं जात आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये करिना कपूर होळी साजरी करायला जाताना दिसत आहे. यावेळी तिची एक चाहती तिच्यासोबत सेल्फी घेण्याचा प्रयत्न करते. मात्र करिना चांगल्या मुडमध्ये नसल्यानं तिच्यावर चिडलेली दिसत आहे. करिनाचा हा व्हिडीओ फोटो जर्नलिस्ट विरल भयानीनं शेअर केला आहे.
मलाकानं अनोख्या अंदाजात साजरी केली होळी, HOT फोटो शेअर करत दिल्या शुभेच्छा
View this post on Instagram
करिना तिच्या चाहतीवर चिडते. त्यानंतर त्या दोघांमध्ये काही बोलणं होतं. मग तिथे असलेल्या मुलींसोबत ती फोटो काढते आणि निघून जाते. करिनाच्या या वागण्यावरुन तिला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केलं जात आहे. या व्हिडीओवर एका युजरनं लिहिलं, अशा सेलिब्रेटींना महत्त्व द्यायलाच नको जे फोटो काढणं तर दूर तुमच्यासोबत नीट हसत सुद्धा नाहीत. तर आणखी एकानं लिहिलं, हे लोक त्यांनाच अॅटिट्यूड दाखवतात ज्यांच्यामुळे हे लोक हीट झाले आहेत. एवढा सुद्धा गर्व करु नये.
सारा-करिनामध्ये आला आहे दुरावा? या कारणामुळे होते आहे सैफच्या कुटुंबाची चर्चा
करिनाच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचं तर तिचा अंग्रेजी मीडियम हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमात करिना पोलिस ऑफिसरच्या भूमिकेत दिसणार असून अभिनेता इरफान खान आणि राधिका मदन हे सुद्धा या सिनेमात प्रमुख भूमिकेत आहेत.
‘घरातून RSS च्या शाखेत पाठवलं जायचं पण...’ बॉलिवूड अभिनेत्याचा खुलासा
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Kareena Kapoor