मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

करण जोहरचा ड्रीम प्रोजेक्ट 'तख्त' बंद होणार? वाचा काय आहे कारण

करण जोहरचा ड्रीम प्रोजेक्ट 'तख्त' बंद होणार? वाचा काय आहे कारण

Karan Johar

Karan Johar

करण जोहर आता त्याचा ड्रीम प्रोजेक्ट 'तख्त' बंद करणार असल्याचं समजत आहे. 'तांडव' वेब सीरीज मुळे उफाळून आलेला वाद आणि कमी पडत असलेलं बजेट अशी प्रमुख कारण असल्याचं समजतंय.

  • Published by:  news18 desk

मुंबई, 02 फेब्रुवारी: गेल्या वर्षभरापासून बॉलिवूड मध्ये करण जोहरचा (Karan Johar) आगामी ड्रीम प्रोजेक्ट, ‘तख्त’ हा चित्रपट लायका प्रोडक्शन्स करणार आहे अशी चर्चा रंगली होती. पण तांडव वेब सीरीजचा वाद उफळून आल्यानंतर अखेरीस करण जोहरने हा चित्रपट बंद करण्याचा निर्णय घेतल्याचं समजत आहे. ज्यामुळे एखाद्या प्रकारचा धार्मिक, राजकीय किंवा सामाजिक वाद उद्भवू शकेल अश्या कोणत्याही प्रकारच्या प्रकल्पापासून करण स्वतःला दूर ठेवू इच्छित असल्याचं समजत आहे. मात्र करण जोहरने ह्या प्रोजेक्ट मधून माघार घेतल्याने दक्षिण भारतातील चित्रपटांमध्ये कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करणार्‍या फिल्म कंपनी लाइका प्रॉडक्शनला हिंदी चित्रपटांमध्ये प्रवेशासाठी मोठा धक्का बसला आहे. अमर उजालाने याबाबत वृत्त दिले आहे.

फॉक्स स्टार स्टुडिओ सारख्या मोठ्या परदेशी कंपनीचे काम हे हिंदी सिनेमा स्टार्सच्या अवास्तव फी आणि चित्रपटांच्या गगनाला भिडणार्‍या बजेटमुळे आता भारतात जवळजवळ थांबले आहे. आणि आता ह्या कंपनीला Disney विकत घेतली आहे. विकत घेतल्यानंतर पहिल्यांदा डिज्नीने करण जोहरच्या आगामी ‘ब्रह्मास्त्र’ ह्या चित्रपटाला दिलेल्या बजेट मध्येच चित्रपट पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच कंपनीचा या चित्रपटाच्या सिक्वलवर पैसे लावण्याचा कोणताही हेतू नाही हे देखील स्पष्ट केलंय. त्यामुळे हा करण जोहर साठी मोठा धक्का मानला जातोय.

(हे वाचा-राज ठाकरेंच्या मदतीला संजय मोने आले धावून! सांगितला 'मोठी बातमी' मागचा अर्थ)

करण जोहरला दुसरा धक्का तेव्हा बसला जेव्हा डिज्नीने त्याच्या चित्रपटात कोणतीही गुंतवणूक करण्यास नकार दिला. ‘ऐ दिल है मुश्किल’, ‘कुछ कुछ होता है’, ‘कभी अलविदा ना कहना’, ‘माय नेम इज खान’, ‘कभी खुशी कभी गम’, ‘स्टूडंट ऑफ द ईयर’ अश्या सुपरहिट चित्रपटांचं दिगदर्शन केलेल्या करण जोहर साठी हा मागील वर्षी एक मोठाच धक्का होता.

पण लॉकडाऊननंतर लायका प्रोडक्शनने हिंदी चित्रपटात प्रवेश करण्यासाठी करण जोहर सोबत मोठा करार केला आणि त्यात ‘तख्त’ सहित अजून पाच-चित्रपटांचा समावेश आहे. करणने ‘तख्त’ चित्रपटाच्या कलाकारांमध्ये रणवीर सिंग, करीना कपूर खान, आलिया भट्ट, अनिल कपूर, जान्हवी कपूर, विक्की कौशल आणि भूमी पेडणेकर इत्यादींचा समावेश केला होता.

(हे वाचा -  Bollywood Drugs Connection: NCB ने घेतले असिस्टंट डिरेक्टरला ताब्यात; सुशांतशी होता थेट संबंध)

सध्याच्या काळातील या प्रसिद्ध कलाकारांच्या तारखा जुळवून चित्रपट बनवणे सोपे नव्हते, परंतु करण जोहरने तारखा पुन्हा एकत्रित करण्याचा प्रयत्न केला. आणि त्यादरम्यान 'तांडव' घडला.

ओटीटी ऑपरेटरनी निर्मात्यांना स्पष्टपणे सांगितले आहे की कथांमध्ये अशी कोणतीही सामग्री असू नये की ज्यामुळे एखाद्या प्रकारचा धार्मिक, राजकीय किंवा सामाजिक वाद उद्भवू शकेल. आणि अशातच 'तख्त' चित्रपटाची संपूर्ण कहाणी मुघल काळातील आहे आणि यामुळे वाद उद्भवण्याची शक्यता आहेच. 'तांडव' या वेब सीरिजपासून संपूर्ण फिल्म इंडस्ट्री तणावग्रस्त आहे आणि कोणताही निर्माता कुठलाच वाद ओढावू घेऊ इच्छित नाही. त्यामुळे अखेर 'तख्त' हा चित्रपट बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

करण जोहर दिग्दर्शकाच्या रुपात शक्य तितक्या लवकर स्क्रीनवर परत येण्याचा सतत प्रयत्नात आहे. तो आता ‘तख्त’ या चित्रपटाच्या मुख्य जोडीसह आणखी एक चित्रपट बनवण्याच्या तयारीत आहे. त्याच्याकडे एक कथा सज्ज आहे आणि करणला वाटत आहे की रणवीर सिंग आणि आलिया भट्ट या कथेला योग्य न्याय देऊ शकतील.

First published:

Tags: Bollywood, Bollywood News, Karan Johar, OTT