मुंबई, 05 जुलै : दिग्दर्शक करण जोहर (Karan johar) तब्बल पाच वर्षांनी दिग्दर्शन क्षेत्रात परतत आहे. त्याने काही वेळापूर्वीच आपल्या सोशल मीडियावर आपल्या नव्या फिल्मबाबत (Karan johar film) घोषणा केली आहे. त्यामुळे अनेक हिट फिल्म देणारा करण आता नवीन कोणती फिल्म घेऊन येतो आहे आणि विशेष म्हणजे या फिल्ममध्ये कोण कलाकार असणार, याकडेच सर्वांचं लक्ष लागलं आहे. करण जोहर यावरील पडदा उद्या उघडणार आहे, पण त्याआधीच न्यूज 18 च्या हाती याबाबत एक्सक्लुझिव्ह माहिती लागली आहे.
करण जोहरने आपल्या फिल्मबाबत आपल्या सोशल मीडियावरून घोषणा केली आहे. पाच वर्षांनंतर तो दिग्दर्शन क्षेत्रात परतला आहे. माझ्या घराच्या दिशेने माझा नवा प्रवास सुरू होतो आहे. माझ्या आवडत्या ठिकाणी परतण्याची ही वेळ. लेन्सच्या मागे एक प्रेमकथा तयार करण्याची वेळ आली आहे, असं ट्विट करण जोहरने केलं आहे.
This is the beginning of a new journey & my way back home - all at once. It's time to go back to my favourite place, it's time to create some eternal love stories from behind the lens. A very special story, truly immersed in the roots of love and family. pic.twitter.com/5XE6ebtnNJ
— Karan Johar (@karanjohar) July 5, 2021
करण जोहरच्या नव्या फिल्ममध्ये अभिनेते धर्मेंद्र (Dharmendra), अभिनेत्री जया बच्चन (Jaya Bachchan) आणि शबाना आझमी (Shabana Azmi), अभिनेता रणवीर सिंह आणि अभिनेत्री आलिया भट्टही दिसणार आहे.
हे वाचा - शर्मिला टागोर होत्या बॉलिवूडची पहिली Bikini Girl; सध्याच्या Top 10 कोण?
जया बच्चन यांनी कभी खुशी कभी घम या करण जोहरने दिग्दर्शित केलेल्या फिल्ममध्ये काम केलं होतं. धर्मेंद्र आणि शबाना आझमी पहिल्यांदाच करणसोबत काम करणार आहे. न्यूज 18 शी बोलताना धर्मेंद्र यांनी सांगितलं, हो मी या फिल्ममध्ये काम करणार आहे. करणसोबत काम करण्यास मी खूप उत्सुक आहे.
हे वाचा - वयाच्या पन्नाशीत राजपाल यादवने बदललं नाव; वाचा काय आहे अभिनेत्याचं नवं नाव
न्यूज 18 ला सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तिघंही या फिल्ममध्ये महत्त्वाची भूमिका निभावणार आहे. ही एक प्रेमकथा आहे. तिन्ही कलाकारांमधील प्रेमाचा त्रिकोण यामध्ये दाखवला जाणार आहे. धर्मेंद्र यांचा या फिल्ममध्ये कधीही न पाहिलेला अवतार दिसणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Entertainment, Karan Johar